मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Best Hotel Management colleges in Nashik: शिक्षण आणि प्लेसमेंट्समध्ये अव्वल; नाशिकमधील टॉप इन्स्टिट्यूट्स

Best Hotel Management colleges in Nashik: शिक्षण आणि प्लेसमेंट्समध्ये अव्वल; नाशिकमधील टॉप इन्स्टिट्यूट्स

 टॉप हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजेसची माहिती

टॉप हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजेसची माहिती

आज आम्ही तुम्हाला नाशिकमधील काही टॉप हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजेसची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 19 सप्टेंबर; आजकालच्या काळात IT आणि हॉटेल्स रेस्टोरेंट्स सिस्टमला प्रचंड मागणी वाढली आहे. उच्चशिक्षित तरुणही आता आपली छोटी हॉटेलं सुरु करून प्रचंड पैसे कमावत आहेत. मात्र कोणताही हॉटेल सुरु करण्याआधी त्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणूनच अनेक तरुण आता इंजिनिअरिंग आणि डॉक्टरपेक्षा हॉटेल मॅनेजमेंटकडे वळू लागले आहेत. मात्र हॉटेल मॅनेजमेंट म्हंटल्यावर चांगल्या इन्स्टिटयूटमधीं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाशिकमधील काही टॉप हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजेसची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Google च्या Interview मध्ये विचारले जातात 'हे' भयंकर प्रश्न; वाचून व्हाल हँग अम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे कॉलेज नाशिकमधील काही नामांकित हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजसपैकी एक आहे. सूरजकुंड, गेट क्र. 64/3, राजूर बहुला, विल्होली जवळ, नाशिक - मुंबई महामार्ग, नाशिक, महाराष्ट्र 422010 इथे असलेलं हे कॉलेज प्लेसमेंटच्या बाबतीतही बेस्ट आहे. तसंच या कॉलेजमध्ये तीन वर्षांचा B.Sc. (Hospitality Studies) हा कोर्स आहे. तसंच Diploma in Hotel Operation हा दोन वर्षांचा कोर्स करता येऊ शकतो. http://www.amroinstitutes.com/ ही या कॉलेजची ऑफिशिअल वेबसाईट आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी हे कॉलेजही नाशिकमधील काही टॉप मॅनेजमेंटच्या कॉलेजसपैकी एक आहे. मुंबई - आग्रा रोड, पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र इथे असलेलं हे कॉलेज प्लेसमनेंत आणि कोर्सेसच्या बाबतीत टॉपवर आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच सुविधा आहेत. तसंच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान प्रदान करण्याचीही सोय आहे. या कॉलेजमध्ये डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (B.H.M.C.T.), पाकशास्त्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम , बेकरी आणि कन्फेक्शनरी मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी (H.M.C.T.) मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे कोर्सेस ऑफर केले जातात. या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही (0253) 2628281, 2628283 या नंबरवर कॉल करू शकता. आता स्कोप नसलेल्या ब्रांचेस सोडा; असं करा 'या' युनिक ब्रांचमध्ये करिअर समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी नाशिकमधील हे कॉलेज डिप्लोमा किंवा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट आहे. मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र ४२२००३ इथे असलेलं हे कॉलेज काही टॉप इन्स्टिट्यूट्सपैकी एक आहे. या कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी - BHMCT, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बेकरी आणि कन्फेक्शनरी मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पाकशास्त्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी (H.M.C.T.) मध्ये प्रमाणपत्र हे कोर्सेस ऑफर केले जातात.
First published:

Tags: Education, Job alert, Nashik

पुढील बातम्या