विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यंदा नाशिक मधील अशोक स्तंभ मित्र मंडळ अनोखा विक्रम करणार आहे. या मंडळाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्तंभ चौकात तब्बल 61 फूट उंच शिवरायांची मूर्ती साकारली आहे. ही भव्य मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. भव्य मूर्ती शिवजयंती निमित्त त्र्यंबकेश्वर रोडवरील एच.पी. ब्रदर्स आर्ट्सचे हितेश आणि हेमंत पाटोळे यांनी ही मूर्ती तयार केली आहे. मूर्ती बनवण्यासाठी एफआरपी फायबर प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. तसेच, आतील साचा स्टीलपासून बनवण्यात आला आहे. मूर्ती साकारण्यासाठी तब्बल चार टन एफआरपी फायबर तर चार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
सर्वात मोठी मूर्ती! नाशिक शहर तसेच जिल्ह्यात दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध मंडळ वेगवेगळे देखावे सादर करत असतात. मात्र, अशोक स्तंभ मित्र मंडळ दरवर्षी अनोखा देखावा साकारत असतं. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचं स्वप्न होतं की शिवरायांची मूर्ती ही भव्य दिव्य साकारायची आणि यावर्षी अखेर 61 फूट उंच शिवरायांची मूर्ती साकारली आहे. माझ्या राजाची जयंती आली..! शिवजयंतीनिमित्त WhatsApp स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश आत्तापर्यंत शिवजयंतीला देशभरात कोणीही इतकी मोठी शिवरायांची मूर्ती साकारली नसल्याचा दावा अशोक स्तंभ मित्र मंडळांनी केला आहे. त्यामुळे आमचे मित्र मंडळ यंदा वर्ल्ड रेकॉर्ड करत असल्याचा दावाही अशोक स्तंभ मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित व्यवहारे यांनी केला आहे. शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा, राजर्षी शाहूंची होती संकल्पना, पाहा Video छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पिंपळगाव परिसरात घडवत असताना एक मोठं संकट ओढवलं. अचानक कार्यशाळेत शॉर्टसर्किटने आग लागली. आणि त्यात छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच मोठं नुकसान झालं. त्यानंतर मूर्तीकारांच्या हाती अवघा 19 दिवसांचा कालावधी राहिला. एवढ्या कमी वेळात त्या मूर्तीकारांनी नव्याने मूर्ती तयार केली. महाराजांच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया मूर्तीकार हितेश पाटोळे यांनी दिली आहे.