नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 15 जानेवारी : नायलॉन मांजाने गळा कापल्याने नागपुरात एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता जळगाव जिल्ह्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धरणगाव तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे एक दुर्घटना घडली. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा - नायलॉन मांजामुळे 11 वर्षाच्या चिमुरड्याने गमावला जीव, नागपुरात नेमकं काय घडलं? अक्षय माळी हा पाचवीत शिकत होता. तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र, तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे. मुलांनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.