नागपूर, 15 जानेवारी : आज सर्वत्र मकर संक्रांतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीच एका 11 वर्षीय मुलावर काळाने घाला घातला आहे. नायलॉन मांजाने गळा कापल्याने या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. काय आहे संपूर्ण बातमी - नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. वेद साहू असे 11 वर्षीय मुलाचे नाव आहे. वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. यावेळी अचानक मांजा आला व त्याचा गळा कापल्या गेला. त्यात तो जखमी झाला. त्याला मानकापूर येथील इस्पितळात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचार झालेच नाही. अखेर रात्री धंतोलीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखम गंभीर होती आणि उपचार मिळायला उशीर झाला. अखेर मकरसंक्रांतीच्या सकाळीच त्याचा मृत्यू झाला. हसतखेळत असलेल्या वेदवर डोळ्यासमोर काळाने घाला घातल्याने पालक व नातेवाईक धक्क्यात आहेत. 24 तासांपूर्वीच धंतोलीत एका मुलाचा पतंग पकडताना रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला होता. यानंतर आता या 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - हातोडा घेऊन आले अन् 38 सेकंदात 16 कोटीचं सोनं लुटलं; चोरीची ही घटना वाचून थरकाप उडेल नायलॉन मांजामुळे जीवाला धोका - मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची बाजारपेठेत सर्रास विक्री होते. पतंग उडवणाता प्लास्टिक, सिंथेटिकपासून बनवलेल्या काचेचा थर असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो. त्यातून अनेकांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्यावर्षी नायलॉन मांजा विक्री झाल्यामुळे अनेक दुचाकी स्वरांचे गळे कापले गेले. यामध्ये तीन ते चार महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. या सोबतच नायलॉन मांजामुळे पक्षी मृत्यू मुखी पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.