मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बाबाच्या प्रेमात गमावला जीव, आनंदाच्या भरात भेटायला धावलेल्या लेकीचा बापाच्या डोळ्यासमोर मृत्यू

बाबाच्या प्रेमात गमावला जीव, आनंदाच्या भरात भेटायला धावलेल्या लेकीचा बापाच्या डोळ्यासमोर मृत्यू

 कामावर गेलेले वडील घरी परतल्यावर त्यांना भेटण्यासाठी घराबाहेर गेलेल्या चिमुरडीचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

कामावर गेलेले वडील घरी परतल्यावर त्यांना भेटण्यासाठी घराबाहेर गेलेल्या चिमुरडीचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

कामावर गेलेले वडील घरी परतल्यावर त्यांना भेटण्यासाठी घराबाहेर गेलेल्या चिमुरडीचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नाशिक, 03 फेब्रुवारी : कामावर गेलेले वडील घरी परतल्यावर त्यांना भेटण्यासाठी घराबाहेर गेलेल्या चिमुरडीचा अपघातात जागीच मृत्यू झाला. वडिलांच्या डोळ्यासमोरच अवघ्या १४ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये ही घटना बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. आयजा अमजद खान असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आयजाचे वडील अमजद अखतार खान हे १५ दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये पत्नीच्या उपचारासाठी नातलगांच्या घरी आले होते. शहरातच एका खासगी कंपनीत ते कामासाठी जात होते. बुधवारी कंपनीतीन सायंकाळी सहाच्या सुमारास ते परतले. तेव्हा त्यांची १४ महिन्यांची चिमुकली आयजा अमजद खान हिला वडील आल्याचं दिसतात ती धावतच त्यांच्याकडे जाण्यासाठी निघाली. तेव्हा घराशेजारी असलेल्या हसनन मुजम्मिल खान यांच्या कारखाली सापडून तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा : 'कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंचा संघर्ष संपेना! घरासाठी परवड सुरूच, Video

हसनन मुजम्मिल खान हे चार चाकी गाडीने घराबाहेर निघाले होते. तेव्हाच रस्त्यापलिकडे असलेल्या वडिलांकडे जाण्यासाठी आयजा वेगाने निघाली होती. त्यावेळी ती थेट गाडीच्या पुढच्या चाकाखाली आली. हसनन खान यांच्या लक्षात न आल्याने ते वाहन घेऊन निघून गेले. तरआयजा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात  पडली. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.मात्र दुर्दैवाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.या प्रकाराबाबत वाहन चालक हसनन खान यांच्या विरोधात वडील अमजद अखतार खान यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Nashik