मुंबई, 13 ऑगस्ट: केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Naryan Rane) यांनी एक घोषणा केली आहे. नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) काढणार आहेत. मुंबई ते कोकण अशी ही जन आशीर्वाद यात्रा असेल.
येत्या 19 ऑगस्टपासून मुंबईतून ही जन आशीर्वाद यात्रा सुरु होईल. मुंबईपासून कोकणपर्यंत ही जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे.
कशी असेल ही जन आशीर्वाद यात्रा
19 आणि 20 ऑगस्ट असे दोन ही यात्रा मुंबईत असेल.
21 ऑगस्टला वसई- विरार
23 ऑगस्टला दक्षिण रायगड
24 ऑगस्टला चिपळूण
25 ऑगस्टला रत्नागिरी
26 ऑगस्टला सिंधुदुर्ग
19 ते 26 असा या जन आशीर्वाद यात्रेचा कालावधी असणार आहे. मुंबईहून सुरु होणाऱ्या या यात्रेचा सिंधुदुर्ग येथे समारोप होईल.
''मी लस विकून पैसे...'', सिरमचे सायरस पुनावाला म्हणतात
केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते राज्य सरकारवर नेहमीच टीका करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर हल्लाबोल केला होता. सव्वा महिना झाला राज्य सरकारचे वाभाडे काढले नाही. त्यामुळे मी 16 तारखेनंतर महाराष्ट्रात येणार आहे, असं ते म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Narayan rane