रत्नागिरी, 24 ऑगस्ट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. राज्यात शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झालेत. त्यातच नाशिक (Nashik)आणि पुण्यात (Pune) राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले असून अटकेची तयारी सुरु असल्याची माहिती समोर येतेय. त्यातच नारायण राणेंची तब्येत(Narayan Rane Health Update) बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.
नारायण राणे यांची बीपी-शुगर वाढला असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरु आहे. , प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली आहे. तसंच स्थानिक एसपी आले असून ते राणेसाहेबांना अटक करत आहेत. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नाही, असं प्रमोद जठार यांनी सांगितलं आहे.
नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया
दरम्यान एस पी म्हणतात आमच्यावर वरुन खूप दबाव आहे. पण आम्ही त्यांना अटक वॉरंट दाखवण्यास सांगत आहोत. त्यांच्याकडे वॉरंटच नाही. जोपर्यंत वॉरंट दाखवत नाहीत, तोपर्यंत कारवाई होऊ देणार नसल्याचं प्रमोद जठार यांनी म्हटलंय.
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं समजतंय. मात्र त्याच दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narayan rane