जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी ! रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची दाट शक्यता

मोठी बातमी ! रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची दाट शक्यता

मोठी बातमी ! रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची दाट शक्यता

Narayan Rane anticipatory bail application reject by court: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    रत्नागिरी, 24 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायलयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नारायण राणेंच्या अटकेची दाट शक्यता (Possibility of arrest) निर्माण झाली आहे. (Narayan Rane anticipatory bail application reject by court) नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचं वृत्त समोर येत आहे. ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी भाजप नाही, पण नारायण राणेंच्या पाठीशी भाजप उभा - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे फार महत्त्वाचे पद देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला. मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. त्या वक्तव्याचं समर्थन नाही पण… महाराष्ट्राचे मुख्मयंत्री स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात याुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात