निलेश पवार प्रतिनिधी नंदुरबार, 6 ऑक्टोबर : नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar Zilla Parishad) निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या कोळदे गटामधील सुप्रिया गावित (Supriya Gavit) विजयी झाल्या आहेत. सुप्रिया गावित या खासदार हिना गावित यांच्या बहीण आहेत. तर आमदार विजयकुमार गावित यांच्या सुप्रिया गावित या कन्या आहेत. सुप्रिया गावित यांनी शिवसेना उमेदवाराचा 1269 मतांनी पराभव केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवली होती आणि मतदारांनी आपल्या पदरात मते टाकली असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया गावित यांनी दिली आहे. म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी नंदुरबारमध्ये काँग्रेसने खाते उघडले असून म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहेत. हेमलता शितोळे यांनी भाजप उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे. हेमलता शितोळे यांनी 1923 मतांनी विजय मिळवला आहे. शहादा तालुक्यातील लोणखेडा गटातून भाजपाच्या जयश्री पाटील 4204 मतांनी विजयी अक्कलकुवा गटातुन काँग्रेस च्या मकरांनी सुरय्या बी अमीन विजयी काँग्रेसने खाते उघडले म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, नरखेड पंचायत समितीवर भाजपचं वर्चस्व नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक जिल्हा परिषद 11 जागांसाठी तर 3 पंचायत समितीच्या 14 गटांच्या पोटनिवडणुका शिवसेना - 8 जागांवर उमेदवार - सर्व जागांवर ओबीसी उमेदवार भाजप - 11 जागाांवर उमेदवार - 8 ओबीसी तर 3 आदिवासी उमेदवार कॉंग्रेस - 5 जागांवर उमेदवार - 3 ओबीसी, 2 आदिवासी उमेदवार राष्ट्रवादी - 4 जागांवर उमेदवार - ओबीसी आणि SC प्रत्येकी 1, आदिवासी 2 उमेवार महाविकास आघाडी काही जागांवर एकत्र नंदुरबारमधील चुरशीच्या लढती खापर गट - नागेश पाडवी X गीता पाडवी कोपर्ली गट - राम रघुवंशी X पंकज गावित कोळदा गट - सुप्रिया गावित X आशा पवार धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गट, पंचायत समितीच्या 30 जागांसाठी पोटनिवडणूक जिल्हा परिषद - 15 गट पंचायत समिती जागा - 30 जिल्हा परिषदेची 1 जागा बिनविरोध पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध प्रमुख लढत - भाजप विरुद्ध महाविकास आघाडी 15 पैकी जिल्हा परिषदेची 1 जागा तर पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. धुळ्यात गेल्या वेळचं चित्र काय होतं ? गेल्या अनेक वर्षांपासून काँगेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजप ने बहुमताने सत्ता काबीज केली होती. गेल्या निवडणुकीत 15 पैकी 11 जागांवर भाजपचे उमेदवार निवडणून आले होते तर काँग्रेसच्या 2 तर शिवसेनेच्या 2 जागा होत्या. दरम्यान यावेळेस भाजपच्या जागा वाढतात की घटतात हे पाहावे लागणार आहे. कुठल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती जागा ? नागपूर - 16 धुळे - 15 पालघर - 15 वाशिम - 14 नंदुरबार - 11 अकोला - 14 पंचायत समिती नागपूर - 31 धुळे - 30 वाशिम - 27 नंदुरबार - 14 पालघर - 14 अकोला - 28 प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी धुळे- 60, नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63 टक्के
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.