जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Electric bike : इलेक्ट्रिक दुचाकी वापरताना सावधान! बीडमध्ये भयानक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Electric bike : इलेक्ट्रिक दुचाकी वापरताना सावधान! बीडमध्ये भयानक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

इलेक्ट्रिक दुचाकी वापरताना सावधान!

इलेक्ट्रिक दुचाकी वापरताना सावधान!

Electric bike : बीड शहरात दुकानासमोर लावलेल्या इलेक्ट्रिक गाडीचा भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 24 जून : गेल्या एकदोन वर्षात इलेक्ट्रिक दुचाकी पेट घेण्याच्या घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात काहीजण जखमी झाल्याचंही समोर आलं आहे. अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे. दुकानासमोर उभी असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली. यामुळे  एकच खळबळ उडाली आहे. हा स्फोट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघतात जीवितहानी टळली आहे. मात्र, एकजण किरकोळ जखमी झाला. या घटनेमुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काय आहे घटना? बीड शहरातील बशीरगंज भागात ईडन कम्प्युटर्स या पठाण फिरोज खान यांच्या दुकानासमोर उभी असलेल्या दुचाकीमध्ये सामान ठेवताना हा भीषण स्फोट झाला आहे. स्फोटानंतर काही तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आगीचा भडका जास्तच उडाला. यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पथक पोहचले आहे. या स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी गाडी मालक पठाण फेरोज खान यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. 76 हजार रुपये देऊन बाईक खरेदी केली होती. बाईक घेतल्यानंतर दोन वर्षात अशी घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाचा - टरबूज कापताना छातीत घुसला चाकू, लिव्ह इन पार्टनरचा मृत्यू, अपघात का घातपात? इलेक्ट्रिक दुचाकी वापरताना सावधान सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्याने इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, याच इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली नाही तर काय होऊ शकते याचं एक उदाहरण बीडमध्ये समोर आलं आहे. शहरात एका दुचाकीचा स्फोट होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पेट्रोलच्या तुलनेत अनेक इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत कमी आहे, तुलनेने देखभालीचा खर्चही जास्त नाही. या दुचाकी हलक्या असल्याने खास करून महिलांनाही त्या हाताळण्यास सोप्या जातात. इलेक्ट्रिक वाहने ही प्रदूषण विरहित असल्याने सरकारकडूनही त्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. मात्र, अशा दुचाकी वापरताना काळजी घेतली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात