ABVPने महाराष्ट्रातील मोठा चेहरा गमावला, महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा धबधब्यात बुडून मृत्यू

ABVPने महाराष्ट्रातील मोठा चेहरा गमावला, महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा धबधब्यात बुडून मृत्यू

संघटनेतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी अनिकेत ओव्हाळ हे धडगाव तालुक्यात आले होते.

  • Share this:

निलेश पवार, नंदूरबार, 11 नोव्हेंबर : आखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा आज नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

संघटनेतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी अनिकेत ओव्हाळ हे धडगाव तालुक्यात आले होते. त्यानंतर अनिकेत आपल्या 6 मित्रांसमवेत आज सकाळी बिलगाव धबधबा पाहण्यासाठी गेले. दुपारी दोनच्या सुमारास अंघोळीसाठी पाण्यात गेल्यानंतर परतत असताना त्यांचा पाय घसरला. पाय घसरल्यानंतर ते पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे मित्र विराज ठाकरे यांनी धाव घेतली. मात्र ते देखील पाण्यात बुडत असल्याने त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.

या घटनेत एव्हीबीपीचे महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा मृत्यू झाला आहे. सिधेश्वर अशोक लटपटे या त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीवरून त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह सध्या धडगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

हेही वाचा- अहमदनगरमध्ये भर-रस्त्यात गोळ्या झाडून हत्या, 4 वर्षांनंतर न्यायालयाने आरोपींना सुनावली शिक्षा

दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनिकेत ओव्हाळ हे राज्यभरातील आपल्या संघटनेचे बाजू हिरिरीने मांडणारा तरुण म्हणून परिचित होते. त्यांच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रातील लोकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 11, 2020, 7:03 PM IST
Tags: abvp

ताज्या बातम्या