मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अहमदनगरमध्ये भर-रस्त्यात गोळ्या झाडून हत्या, 4 वर्षांनंतर न्यायालयाने आरोपींना सुनावली शिक्षा

अहमदनगरमध्ये भर-रस्त्यात गोळ्या झाडून हत्या, 4 वर्षांनंतर न्यायालयाने आरोपींना सुनावली शिक्षा

अखेर 4 वर्षानंतर मृत हिंमत जाधव यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अखेर 4 वर्षानंतर मृत हिंमत जाधव यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अखेर 4 वर्षानंतर मृत हिंमत जाधव यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर, 11 नोव्हेंबर : अहमदनगर शहरात झालेल्या हिंमत जाधव खून प्रकरणात आज न्यायालयाने सर्व सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच एक लाख वीस हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे अखेर 4 वर्षानंतर मृत हिंमत जाधव यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कसा झाला खून?

हिंमत जाधव हा त्याचा मित्र संतोष चव्हाण यासोबत 13 सप्टेंबर 2016 रोजी अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याच्या कामकाजासाठी दुचाकीवरून आलेला होता. न्यायालयातील कामकाज संपवून तो संतोष चव्हाण याच्या गाडीवर मागे बसून औरंगाबाद रोडने घरी जात होता. मात्र तेव्हाच त्यांची गाडी इमामपूर घाटाजवळ असताना मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी हिंमत जाधव यांच्यावर बंदुकीतून गोळया झाडल्या. त्यामुळे हिंमत जाधव खाली पडला व मोटारसायकल घसरली.

झालेल्या प्रकारामुळे घाबरून संतोष चव्हाण याने घाटाखाली चहा पिण्यासाठी त्यांची वाट बघत असलेल्या लक्ष्मण कुसळकर यांच्याकडे धाव घेतली. दरम्यानच्या काळात हिंमतवर झालेल्या गोळीबाराची माहिती त्याच्या घरच्यांना तसंच पोलिसांना मिळाल्यामुळे घटनास्थळी हिंमतचे वडिल, भाऊ व पोलीस पोहोचले. घटनास्थळी हिंमत हा रक्ताच्या थारोळयात पडलेला होता व त्याचा जागीच मृत्यू झालेला होता.

त्यानंतर हिंमतचे प्रेत शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. झाल्या प्रकाराबाबत संतोष चव्हाण याने एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन येथे तीन अनोळखी व्यक्तींविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार एम.आय.डी.सी.पोलिसांनी भा.द.वि. कलम 302 व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. सुरुवातीस गुन्ह्याचा तपास एम.आय. डी.सी.पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरी.राहुल पवार यांनी केला. त्यानंतर मयत हा भिल्ल समाजाचा असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रकरणाचा पुढील तपास सहा.पोलीस अधिक्षक आनंदा भोईटे यांनी केला व बहुतांश साक्षीदारांचे जबाब, काही आरोपींना अटक, पंचनामे, हत्यारजप्ती इ.महत्वपूर्ण बाबी पूर्ण केल्या. त्यानंतर आनंदा भोईटे यांची बदली झाल्याने प्रकरणाचा पुढील तपास सहा.पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केला व उर्वरीत आरोपींना अटक करून पंचनामे, हत्यारजप्ती केले.

सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सहा.पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी मा.न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा.जिल्हा न्यायाधीश श्री.एस.आर.जगताप यांच्या समोर झाली आणि त्यांच्याकडे सरकार पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील श्री.केदार गोविंद केसकर यांनी एकुण 25 साक्षीदार तपासले. माहे फेब्रुवारी 2020 मध्ये मा.जिल्हा न्यायाधीश श्री.एस.आर.जगताप साहेब यांनी रत्नागिरी येथे बदली झाल्याने प्रकरणातील पुढील कामकाज, सरकार पक्षाचा युक्तिवाद व आरोपींच्या वतीने युक्तिवाद श्रीमती.एम.व्हि.देशपांडे मॅडम यांचेसमोर करण्यात आले.

का करण्यात आली हिंमत जाधव यांची हत्या?

न्यायालयासमोर आलेल्या एकूण पुराव्यानुसार आरोपी राजु शेटे याने मयताबरोबर असलेल्या शत्रुत्वापोटी आरोपी कृष्णा कोरडे, सोमनाथ मोरे, अजिनाथ ठोंबरे यांना हिंमतला मारण्याची सुपारी दिली व घटनेच्या दिवशी आरोपी संदिप थोपटे, राहुल दारकुंडे यांनी मयताचे लोकेशन गोळया झाडणाऱ्या आरोपींना वेळोवेळी दिले. तसेच आरोपी जावेद शेख याने गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका इतर आरोपींना पुरविल्या, ही बाब सिध्द झाली. सदर खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी संतोष चव्हाण, मयताचे वडिल अभिमन्यू, बहिण दिपाली तसेच फोटोग्राफर दादा शिर्के, सी.सी.टि.व्ही. तज्ञ ब्रजेश गुजराथी, शवविच्छेदन करणारे औरंगाबाद येथील डॉ.विकास राठोड, कलिना मुंबई येथील बॅलेस्टिक एक्सपर्ट डॉ. मुलानी, सी.सी.टी.व्ही. व फोटो तज्ञ वर्षा भावे, तपासी अधिकारी श्री.राहुल पवार, श्री.आनंदा भोईटे व श्री.मनिष कलवानिया व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

मा.न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा, कागदोपत्री पुरावा तसेच सहाय्यक सरकारी वकील श्री.केदार गोविंद केसकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा.न्यायालयाने आरोपींना दोषी धरले व त्यांना भा.द. वि.का.कलम 302, 120ब अन्वये दोषी धरून प्रत्येक आरोपीस आजन्म कारावासाची व एकूण 1,19,000/-रूपये दंडाची शिक्षा दिली.

सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पो.हे.कॉ.बी.बी.बांदल, पो.कॉ.दिपक गांगर्डे यांनी सहाय्यक सरकारी वकील श्री.केदार गोविंद केसकर यांना साहाय्य केले. तसेच सदर प्रकरणाचे कामकाज यशस्वीरित्या चालविण्याकामी जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील यांनी सहाय्यक सरकारी वकील श्री.केदार गोविंद केसकर यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

आज आरोपींना शिक्षा करतेवेळी न्यायालयाच्या परिसरात पोलीसांचा अतिशय कडक बंदोबस्त कॅम्प पोलीस स्टेशनचे पो.उप.निरी.श्री.देशमुख यांचे अधिपत्याखाली नेमण्यात आलेला होता. त्यांना कोर्टातील पोलीस सुरक्षा अधिकारी स.फौ. एल.एम.काशिद, हे.कॉ. सांगळे व हे.कॉ.पटेल यांनी सहाय्य केले.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news