मुंबई, 05 नोव्हेंबर : काँग्रेसचे 22 आमदार फुटणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तशी तयारी केली आहे, असा दावाच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. पण, 'जे सत्तेत राहून आपला पक्ष सांभाळू शकले नाही, त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सणसणीत टोला लगावला.
जे सत्तेत राहून आपला पक्ष सांभाळू शकले नाही, त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर नाना पटोले यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
('मी मुस्लीम आहे, पांडुरंग माझं आधी ऐकेल'; अब्दुल सत्तारांचं देवाकडे 'हे' साकडं)
'त्याच्यामुळे दुसरं काही बोलण्याची गरज नाही. पहिले आपलं घर पाहायचं आणि मग दुसऱ्यांच्या घरावर रेघोट्या मारायच्या. जे काही होणारच नाही. त्यांच्याबद्दल कोणी बोलायला निघाले असतील. सत्तेत राहून स्वत: घर सांभाळू शकले नाही, त्यांनी यावर बोलू नये, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
(नवाब मलिकांना धक्का, साम्राज्याला लागणार टाळे, ईडी जप्त करणार मालमत्ता)
तर, चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य मागे घ्यावे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात असताना खैरे यांचे विधान संयुक्तिक नाही, त्यांनी असं बोलायला नको होते, असं म्हणत विधान मागे घेण्याची मागणी सतेज पाटील यांनी केली.
सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारणे हे चुकीचे आहे. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असंही सतेज पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे ?
कोर्टाने निर्णय दिला तर शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले जातील. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्रिपद कायम राहावे यासाठी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे. काँग्रेसची सध्या रॅली सुरू आहे. त्यामुळे सगळे शांत बसलेले आहे, असा दावाच चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. याआधीही नारायण राणेंनी बंड पुकारलं होतं. त्यावेळी ते सुद्धा निवडून आले नव्हते. राणे निवडून येऊ शकले नाही तर हे कोण आहे. पैसा वैगेरे काहीही नाही, लोक मतदान बरोबर करतात. ठाण्यात त्यांची ताकद कितीही असेल तरीही आमचे खासदार त्यांच्याकडे गेले नाही, 40 आमदार तर पडणारच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण पडणार आहे. छगन भुजबळ, नारायण राणे पडले होते, असं भाकितही चंद्रकांत खैरेंनी वर्तवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nana Patole