मुंबई, 30 ऑक्टोबर : राज्यात मागच्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील विरोधी पक्षांकडून सरकारवर दबाव टाकत मदतीसाठी विचारणा केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजीत पवार यांच्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसनेही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले हे अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्यपालांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. पटोले आज(दि.30) माध्यमांसोबत बोलत होते यावेळी त्यांनी राज्यसरकारवही सडकून टीका केली.
A delegation of Maharashtra Congress will meet Governor Bhagat Singh Koshyari tomorrow to demand compensation to the farmers affected by the heavy rains in the state and the dismissal of the current state government: State Congress president Nana Patole pic.twitter.com/gM4Zfei7kG
— ANI (@ANI) October 30, 2022
पटोले म्हणाले कि, राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला मिळणार आणखी 2कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्री, ‘ही’ दोन नावं चर्चेत!
राज्यात शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळत नसेल तर सरकार काय करत आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कित्येक दिवसांपासून शेतकरी मदतीविना असल्याने तो टोकाचे पाऊल उचलत आहे. यामुळे हे सरकार बरखास्त करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे पटोले म्हणाले.
राहुल गांधीच्या दौऱ्याबाबत आढावा बैठक
मागच्या कित्येक दिवसांपासून राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. ही यात्रा महाराष्ट्रात येणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते या यात्रेच्या नियोजनासाठी कामाला लागले आहेत. दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल आणि एचके पाटील हे राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेच्या राज्यात आगमनाचे नियोजन करण्यासाठी आज महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पटोले यांनी दिली.
नाना पटोलेंची टाटा एअर बसवरूनही जोरदार टीका
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी-शाह यांनी ‘ईडी’चा वापर करून हे सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांचे सरकार आणले. राज्यात सरकार बदलल्यापासून केवळ तीन महिन्यांत वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प गुजरातला गेले.
हे ही वाचा : किरीट सोमय्यांच्या आरोपातून किशोरी पेडणेकरांनी पुराव्यासह काढली हवा, म्हणाल्या….
काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला, असे खोटे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे, असा प्रश्न पडतो. असे पटोले म्हणाले