मुंबई, 06 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं (Chhatrapati Shivaji Maharaj) अनावरण केलं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पंतप्रधानांनी केला. छत्रपतींच्या विरोधातली मानसिकता स्पष्ट दिसतेय, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी (Nana Patole) म्हटलं आहे. राज्यपाल देखील अपमान करतात. भाजपसाठी नरेंद्र मोदींच देव आहेत असं वर्तन भाजपचं आहे, असा हल्लाबोलही पटोलेंनी भाजपला लगावला आहे. राजमुद्रा आणि छत्रपतींचा अपमान करण्याचा कॉन्ट्रॅक्ट भाजपनं घेतलाय का?, असा सवालही नाना पटोलेंनी भाजपला विचारला आहे. नरेंद्र मोदी गो बॅकचे नारे पुण्यात बघायला मिळत आहे. देशभरात मोदींचा विरोध होतोय. पुण्याच्या जनतेची मोदी गैरसोय करता आहेत. पुणेकर देखील भाजपवर नाराज दिसत असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. नाना पटोले यांचं ट्विट नाना पटोलेंनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यात मोदींचा फोटो आहे. या फोटोत मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करताना दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे. #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा pic.twitter.com/HGaQW1jtaG
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 6, 2022
हा फोटो शेअर करत नाना यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे. #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा,असं कॅप्शन दिलं आहे.