जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 2019ची चूक सुधारायला इतका वेळ का लागला? नाना पाटेकरांनी मुख्यमंत्र्याच्या मर्मावर ठेवलं बोट

2019ची चूक सुधारायला इतका वेळ का लागला? नाना पाटेकरांनी मुख्यमंत्र्याच्या मर्मावर ठेवलं बोट

2019ची चूक सुधारायला इतका वेळ का लागला? नाना पाटेकरांनी मुख्यमंत्र्याच्या मर्मावर ठेवलं बोट

2019 ची चूक सुधारायला अडीच वर्ष का लागली? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑक्टोबर : मुंबईत आज लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा रंगला. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर आणि लोकमत समूहाचे विजय दर्डा यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक प्रश्न विचारला. नानांच्या प्रश्नावर शिंदेंनी काय उत्तर दिले - 2019 मध्ये जे व्हायला पाहिजे होतं ते आम्ही 3 महिन्यांपूर्वी केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुलाखती दरम्यान, म्हणाले. यावर 2019 ची चूक सुधारायला अडीच वर्ष का लागली? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला. त्यावर प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ काळ जुळून यावी लागते, असं उत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. तसेच या मुलाखतील एकनाथ शिंदे म्हणाले की, नानांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे काही केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर केला आहे. तो 2019 ला व्हायला हवा होता. तेव्हा आम्ही शिवसेना भाजपा युती म्हणून लढलो होतो. आम्हाला बहुमत मिळाले होते. भाजपाचे 100 हून अधिक आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. सर्व मतदारांना वाटलं होतं की बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. मात्र, दुर्दैवाने तसं झालं नाही. यानंतर आम्ही तीन महिन्यांपूर्वी ते केलं, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर नाना पाटेकर यांनी हे करायला अडीच वर्ष का लागली, असा प्रश्न विचारला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, असे व्हायला वेळ लागला कारण, या सगळ्या गोष्टी घडवून यायला योग्य वेळ यावी लागते. दरम्यानच्या काळात काळात कोविड होता. त्या काळात असं काही केलं असतं तर कोविड असताना असं का करताहेत, असा प्रश्न विचारला गेला असता. त्या काळात आम्ही प्रयत्न करत होतो. अखेर तीन महिन्यांपूर्वी आम्ही तुमच्या मताचा आदर केला, या शब्दात एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. हेही वाचा -  Shivsena Symbol: काल संतापले अन् आज… ‘परफेक्ट’ निशाणी मिळाल्यानंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे? तर सरकार हे फेसबुक लाईव्हवर बनवता येत नाही. म्हणून आम्ही कोरोना संपला आणि एकत्र आलो आणि फिजिकल सरकार स्थापन केलं, असा टोलाही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात