नालासोपारा, 13 मार्च : विरार पूर्वेकडील खानिवडे येथे एकतर्फी प्रेमातून (Love Affair) घरात घुसून 4 जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. तसंच हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःचीही नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात (Virar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पूर्वेकडील खानिवडे गावात शनिवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान एक 20 ते 22 वयाच्या तरुणाने राजेश तरे यांच्या घरात घुसून राजेश यांच्या दोन मुलींवर धारदार शस्त्राने हल्ला करून स्वतःची नस कापून घेतली. यावेळी राजेश व त्याची पत्नी हे त्यांच्या घरापासून काही अंतरावर जवळच्या नातेसंबंधातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले होते. तर याच दुखवट्यासाठी विरार व पालघरमधील टेम्भोडे येथे राहणारे त्यांचे नातेवाईक रमेश तरे व त्यांची पत्नी रेखा तरे यांच्यासह भावजय अंजली तरे हे राजेशकडे रात्र वस्तीसाठी थांबले होते. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा रमेश तरे यांनी मोठा प्रतिकार केला. मात्र त्या तरुणाने त्यांनाही मोठ्या प्रमाणात धारदार शास्त्राने वार करून जखमी केले. अंजली तरे या बाथरूममध्ये स्नान करत असताना किंचाळण्याचा आवाज ऐकून त्या स्नान अर्धवट टाकत बाहेर आल्या. त्यांना जे दृश्य दिसले त्यामध्ये त्यांनी सावरून लागलीच त्या तरुणाने घरात घुसताना बंद केलेल्या दारांपैकी मागील दार उघडून आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. हेही वाचा - सेक्स न करताच गरोदर राहिली तरुणी, हे नेमकं कसं घडलं? वाचून तुम्हालाही बसेल धक्का दरम्यान, माथेफिरू तरुणाने अंजली यांच्याही हातावर वार केले आणि लोक जमल्याचे पाहून आपल्या डाव्या हाताची नस कापून बाथरूम मध्ये स्वतःला बंद करून घेतले. जमलेल्या गावकऱ्यांनी प्रथम पोलिसांना माहिती देत जखमींना विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी सदर तरुणाला बाहेर येण्यासाठी सांगितले. मात्र बाथरूमच्या खिडकीतून तो त्याच्या जवळील धारदार शस्त्र उगारून दाखवत असल्याने अत्यंत सावधगिरी बाळगून दरवाजा फोडून स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून रक्तांबळ स्थितीत असलेल्या त्या तरुणाला दवाखान्यात दाखल केले. यावेळी तरे यांच्या संपूर्ण घरात अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. सदर तरुण हा गावातला नसून तो नेमका कोण व हा एकंदरीत प्रकार काय आहे याचा तपास विरार पोलीस करत आहेत. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून आरोपीविरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.