जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वीज पुरवठा सुरळीत करायला रोहित्रावर चढला तरुण, विजेच्या धक्क्याने घडली भयानक घटना

वीज पुरवठा सुरळीत करायला रोहित्रावर चढला तरुण, विजेच्या धक्क्याने घडली भयानक घटना

फोटो क्रेडिट - लोकमत

फोटो क्रेडिट - लोकमत

मृत शरद धोटे याचे चिचोली-भागडी शिवारात दोन एकर शेत आहे.

  • -MIN READ Bhandara,Maharashtra
  • Last Updated :

भंडारा, 3 सप्टेंबर : वीज रोहित्रावर झालेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी चढलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेच्या धक्क्याने या तरुणाने या तरुणाचा मृत्यू झाला. सिंचन खोळंबल्याने बिघाड दुरूस्तीसाठी रोहित्रावर चढणे या तरुणाच्या जीवावर बेतल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शरद यादो धोटे (वय-32, रा. भागडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिचोली-भागडी शिवारात शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. मृत शरद धोटे याचे चिचोली-भागडी शिवारात दोन एकर शेत आहे. शेतात सिंचनासाठी कृषी वीजपंपही आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शरद पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. यावेळी त्याने मोटारपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंप सुरू न झाल्याने वीज पुरवठ्यात बिघाड झाला असावा, असे त्याला वाटले. त्यामुळे तो वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतातील रोहित्राजवळ पोहोचला. यावेळी शरदने रोहित्राचा वीजपुरवठा बंद केला आणि तो वर चढला. मात्र, काही कळायच्या आत त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि रोहित्रावर लटकलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना, महावितरण कंपनीसह पोलिसांनाही देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यावर लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणेदार रमाकांत कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज उईके, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे, पोलीस नायक दिलीप भोयर, सुभाष शहारे, अंमलदार अनिल राठोड, संदीप रोकडे यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. हेही वाचा -  ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा धसका, वनक्षेत्र सहाय्यकाने घेतला धक्कादायक निर्णय यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. सिंचन खोळंबल्याने बिघाड दुरूस्तीसाठी रोहित्रावर चढणे या तरुणाच्या जीवावर बेतले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात