मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा धसका, वनक्षेत्र सहाय्यकाने घेतला धक्कादायक निर्णय

'लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा धसका, वनक्षेत्र सहाय्यकाने घेतला धक्कादायक निर्णय

नेहमीप्रमाणे अजाबराव लोहारे बुधवारी सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले होते.

नेहमीप्रमाणे अजाबराव लोहारे बुधवारी सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले होते.

नेहमीप्रमाणे अजाबराव लोहारे बुधवारी सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India

भंडारा, 31 ऑगस्ट : भंडारा जिल्ह्यातील एका वनक्षेत्र सहाय्यकाने धक्कादायक निर्णय घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलाविल्याचा धसका घेत त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना तुमसर तालुक्यातील गायमुख जंगलात बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अजाबराव सीताराम लोहारे (वय-52, रा. परसोडी ता. उमरेड जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

मृत अजाबराव लोहारे हे ते तुमसर तालुक्यातील लेंडझरी वनपरिक्षेतांर्गत विटपूर बिटमध्ये क्षेत्र सहाय्यक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे अजाबराव लोहारे बुधवारी सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले होते. मात्र, गायमुख जंगलातील खैराच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. यानंतर या घटनेची माहिती वन विभागासह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

लाच घेताना पकडले होते -

मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्टला लेंडेझरी येथे लाच घेताना दोन वनरक्षकांसह चौघांना रंगेहात पकडण्यात आले होते. रेतीचा टॅक्टर सोडविण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली होती. याच कारवाई संदर्भात अजाबराव लोहारे यांना सोमवार 29 ऑगस्ट रोजी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलाविले होते.

हेही वाचा - भंडारा : डोळ्यादेखत उभं पीक उद्धवस्त झाल्याने खचला शेतकरी; तणावात उचललं टोकाचं पाऊल

मात्र, त्याचा धसका घेत त्यांनी आत्महत्या केली, असे त्यांचा मुलगा मनीष लोहारे याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या मुलाने आंधळगाव पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. यावरुन सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश मट्टामी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Forest