Nagpur : तथागताचे वैभवसंपन्न ड्रॅगन पॅलेस टेम्पल, बौद्ध पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध
Nagpur : तथागताचे वैभवसंपन्न ड्रॅगन पॅलेस टेम्पल, बौद्ध पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध
नागपूरपासून 14 किमी अंतरावर कामठी येथे विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धविहार या पवित्र संकल्पाचा आरंभ करीत उभे आहे. जपानी स्थापत्यशैलीतील बांधलेले हे एकमेव धार्मिक स्थळ आहे. बौद्ध मंदिर दरवर्षी पर्यटकांना आकर्षित करते.
नागपूर, 22 जून : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा म्हणून नागपुरची (Nagpur District) ओळख असून इतिहासात नेहमीच नागपूरचं स्थान महत्वाचं राहिले आहे. नागपुरात संस्कृती, भौगोलिक प्रदेश, खाद्यसंस्कृती, भरपूर वनसंपदा, खनिजसंपत्ती आहे. यासह ड्रॅगन पॅलेस (Dragon Palace Temple, Nagpur) हे नागपुरातील प्रसिद्ध स्थळ असून जिल्ह्यातील कामठी तालुक्यात वसलेले आहे. येथील वातावरण अंत्यत शांतपूर्ण आणि अल्हाददायक असतं. पॅलेसबद्दल या विशेष रिपोर्टमधून माहिती पाहूया.विश्वाला शांतीच्या मार्गाने तथागत बुद्धांनी प्रज्ञा, शील, करुणा या त्रिसूत्रीना एकत्र करून शांती, मानवता, समता, बंधुता व मैत्री भाव शिकवला. आणि बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला. नागपूरपासून 14 किमी अंतरावर कामठी येथे विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धविहार या पवित्र संकल्पाचा आरंभ करीत उभे आहे. जपानी स्थापत्यशैलीतील बांधलेले हे एकमेव धार्मिक स्थळ आहे. बौद्ध मंदिर दरवर्षी पर्यटकांना आकर्षित करते. येथे, भाविक अनेकदा बौद्ध प्रार्थना आणि तासन-तास ध्यान करताना दिसतात. ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर, ज्याला नागपूरचे लोटस टेंपल असेही म्हणतात. अलीकडेच 1999 मध्ये जपानमधील ओगावा समाजाने दान केलेल्या पैशातून मंदिराची स्थापना करण्यात आली.10 एकर जागेत भव्य मंदिर
ड्रॅगन पॅलेस हे 10 एकर जागेवर पसरलेले एक मोठे, प्रतिष्ठित मंदिर आहे. या मंदिरात सभामंडपाच्या पहिल्या मजल्यावर भगवान बुद्धांची मोठी मूर्ती बसवण्यात आली आहे. हे मंदिर नागपुरातील कांप्टी नावाच्या सॅटेलाइट टाउनमध्ये आहे. हे ठिकाण एक शांततापूर्ण बौद्ध प्रार्थना केंद्र आहे. याला लोटस टेंपल असेही म्हणतात. येथे एक बाग आहे जी आकर्षक वास्तुकलेने सजलेली आहे.
वाचा : Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी!भगवान बुद्धांची सहा फूट उंच मुर्ती जपानी स्थापत्यशैलीतील बांधलेले हे एकमेव धार्मिक स्थळ आहे. कर्मयोगी दादासाहेब कुंभारे परिसरातील 10 एकर जागेत हे मंदिर उभारण्यात आले आहे. या बौद्धविहारात तळमजल्यावर वातानुकूलित सभागृह, वाचनालय आणि फोटो गॅलरी पाहावयास मिळते. पहिल्या मजल्यावर मुख्य विशाल असे प्रार्थनागृह आहे येथे भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. अखंड चंदनाच्या लाकडापासून ही मुर्ती बनवण्यात आली आहे. सहा फूट उंच असणारी ही मूर्ती 864 किलोग्राम इतक्या वजनाची आहे. देश-विदेशातील पर्यटक देतात भेटीदरवर्षी येथे देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. धम्मप्रवर्तक दिन, आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा अशा सणाला येथे मोठी गर्दी पहावयास मिळते. बौद्ध धर्मासोबतच अन्य धर्माचेही भाविक मोठ्या संख्येने ड्रॅगन पॅलेसला भेटी देतात, दररोज सुमारे 500 ते 800 हून अधिक पर्यटक ड्रॅगन पॅलेसला भेट देतात. वाचा :Success Story : संसार सांभाळत नाशिकच्या नीलाक्षी लोही ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया’च्या विजेत्या, अशी घेतली मेहनत, पहा VIDEOपत्ता आणि भेटीची वेळड्रॅगन पॅलेस टेम्पल, कर्मयोगी दादासाहेब कुंभारे परिसर, हरदास नगर, कामठी , नागपूर हा पॅलेसचा पत्ता आहे. याठिकाणी पर्यटकांकडून कोणत्याही प्रकारची तिकीट आकारली जात नाही. पर्यकट हे सकाळी 10 पासून ते सायंकाळी 8 पर्यंत ड्रॅगन पॅलेस ला भेट देऊ शकतात. विशेषतः पर्यटक हे सायंकाळच्या वेळी इथं भेट देत असतात.
गुगल मॅपवरून साभार
दिवसातून दोन वेळा होते प्रार्थना दिवसातून दोन वेळा ड्रॅगन पॅलेस येथे प्रार्थना होते. सकाळी 10 ला प्रथम प्रार्थना आणि सायंकाळी 6 च्या सुमारास दुसरी प्रार्थना करण्यात येते.उच्च दर्जाचे बांधकामपॅलेसची निर्मिती अत्यंत उच्च दर्जाचे बांधकाम साहित्याने करण्यात आली असून शेकडो कुशल कामगारांच्या अथक प्रयत्नातून वास्तू साकारली आली आहे. प्लास्टर न करता याठिकाणी कॉक्रिट केलेले आहे. पर्यावरणाच्या आवश्यकतेनुसार छताला निळ्या रंगाच्या इटालियन काचा वापरण्यात आलेल्या आहेत. विहारातील मंच अत्यंत शुभ्र संगमरवरात साकारण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.