जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपुरातील महिलेचे अनैतिक संबंध, मुलाने आईच्या प्रियकरासोबत केलं धक्कादायक कांड

नागपुरातील महिलेचे अनैतिक संबंध, मुलाने आईच्या प्रियकरासोबत केलं धक्कादायक कांड

nagpur crime news

nagpur crime news

या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 14 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. क्राईम सिटी नागपूरमध्येही हत्येच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना नागपूरमधून उघडकीस आली आहे. आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने संतप्त झालेल्या मुलाने आईच्या प्रियकराची हत्या केली. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही खळबळजनक घटना नागपुरातील शांतीनगर म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीची भरवस्तीत हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सुदर्शन कावडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुदर्शन इलेक्ट्रिशियचे काम करायचा. दुचाकीने घरी जात असताना सुदर्शनवर दोन हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. तसेच हल्ला केल्यावर ते पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली. तसेच या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि या आरोपींनी त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपीच्या आईचे मृत व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्याचा राग मनात ठेवून आरोपी शुभम आणि आपला साथीदार शुभमच्या मदतीने सुदर्शनची हत्या केली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा -  मैत्री अन् विश्वासाला काळिमा, पत्नीचा प्रियकर निघाला मित्र

अत्याचार करणाऱ्यावर न्यायालयात सपासप कटरने वार

यवतमाळमध्ये न्यायालयाच्या आवारामध्ये एका आरोपीवर महिलेने कटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशाल शेंडे असे जखमीचे नाव आहे. विशाल शेंडे हा एका महिलेवरील अत्याचार प्रकरणात आरोपी आहे. आज विशालची हजेरी न्यायालयात होती. यावेळी फिर्यादी महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने आरोपीवर कटरने वार करून हल्ला केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आवारात झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात