गोंदिया, 15 डिसेंबर, रवी सपाटे : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने आपली पत्नी, सासरा आणि मुलाला ते झोपेत असताना रात्रीच्या सुमारास पेट्रोल टाकून पेटून दिलं. या घटनेमध्ये सासरे देवानंद मेश्राम यांचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीची पत्नी आणि मुलगा 90 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. किशोर शेंडे आसं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्यानं हे कृत्य का केलं याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सासऱ्याचा मृत्यू घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया शहरातील सुर्याटोला येथे देवानंद मेश्राम वय (52 वर्ष) हे वास्थव्याला आहेत. त्यांच्या घरी त्यांची मुलगी आरती किशोर शेंडे वय 35 वर्ष आणि नातू जय किशोर शेंडे वय 4 वर्ष हे रात्री झोपले होते. याचदरम्यान आरोपी किशोर शेंडे याने आपले सासरे देवानंद मेश्राम यांच्या घरी जावून रात्री बारा ते एक वाजेदरम्यान पत्नी आणि सासरा झोपेत असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटून दिले. या घटनेमध्ये सासरा देवानंद मेश्राम यांचा मृत्यू झाला तर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे व मुलगा जय शेंडे हे नव्वद टक्के भाजले असून, त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी फरार झोपेत सासरा, पत्नी आणि मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटून दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याने हे कृत्य का केलं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.