जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूरकरांना शुद्ध पाणी देण्यासाठी पालिकेनं शोधली नवी पद्धत, पाहा Video

नागपूरकरांना शुद्ध पाणी देण्यासाठी पालिकेनं शोधली नवी पद्धत, पाहा Video

नागपूरकरांना शुद्ध पाणी देण्यासाठी पालिकेनं शोधली नवी पद्धत, पाहा Video

महानगरपालिकेच्या नव्या पद्धतीमुळे नागपूरकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.

  • -MIN READ Local18 Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 01 जानेवारी :   दूषित पाणी हे अनेक आजार होण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारून शुद्ध पाणी नागरिकांना मिळावं या उद्देशाने नागपूर महानगर पालिका व ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) ने नागपूरकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे नागपूर   शहरातील नागरिकांना आता 96% पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा होत आहे. नागपूर शहरात आजघडीला 60 जलकुंभ असून  जवळपास प्रत्येक जलकुंभाची क्षमता 22 लाख लिटर एवढी आहे. गेल्या काही वर्षांपासून जलकुंभाच्या स्वच्छतेची नवी कार्यप्रणाली अवलंबली असल्याने पाण्याच्या स्वच्छतेच्या गुणवत्तेसह वेळेची व मनुष्यबळाची ही मोठी बचत होत आहे. काही वर्षांपूर्वी जलकुंभाची स्वच्छता करताना साधारण 6-7 दिवसांचा कालावधी आणि भरपूर मनुष्यबळ लागत असे.तसेच जलकुंभाचा पाणीपुरवठा 5 ते 6 दिवस खंडित करावा लागत होता. एक दिवसातच काम आता महापालिका अत्याधुनिक पद्धतीने इन हाऊस प्रेशर सिस्टमच्या माध्यमातून जलकुंभ स्वच्छ करते त्यासाठी आता अवघ्या काहीं तासात जलकुंभाची स्वच्छता होते. त्यामुळें पाणीपुरवठाही एक दिवसच खंडित ठेवावा लागत आहे.  या स्वच्छता मोहिमेमुळे 2012 मध्ये पाण्याची गुणवत्ता 69 टक्के होती. ती आता 96 टक्क्यांवर पोहचली आहे.अशी माहिती नागपूर महानगर पालिका व ऑरेंज सिटी वॉटरचे माहिती अधिकारी सचिन द्रवेकर यांनी दिली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पाण्याची गुणवत्ता कायम जलकुंभ स्वच्छते बरोबरच जलशुद्धीकरण केंद्रामध्ये करण्यात येणाऱ्या क्लोरिन डोसिंग, पाणीपुरवठा प्रणालीत ठिकठिकाणी क्लोरीनचे बूस्टर डोसिंग केल्याने जलकुंभ स्तरावर देखील पाण्याची गुणवत्ता राखली जाते. शहरातील 60 जलकुंभाच्या परिसरातील 70-80 नमुने महापालिकेच्या 10 झोनच्या माध्यमातून जमा केले जाते व हे पाण्याचे नमुने प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्ता देखरेखीसाठी स्वतंत्र चमू सतत नमुने गोळा करतो. त्यांचे विश्लेषण, अहवाल आरपीएचएल कडून तपासून घेतो.   Video : देशातील सर्वात मोठा वैज्ञानिकांचा कार्यक्रम नागपुरात, पाहा काय आहे खास! आजार कमी झाले  दूषित पाण्याच्या तक्रारी आल्यास पुन्हा नमुने गोळा करण्यात येतात. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत वाढ झाल्याने पाण्यामुळे होणारे आजार कमी झाले आहेत. एक जलकुंभ जेव्हा शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केला जातो, तेव्हा पाण्याच्या दूषित होण्यामागच्या एका मोठ्या कारणाचे निर्मूलन झाले आहे असल्याचे सचिन द्रवेकर यांनी सांगितले.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nagpur , water
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात