अमरावती, 9 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देहविक्रय कर पण मला पैसे आणून दे धमकी एका पतीने आपल्या पत्नीला दिली. तसेच त्याने आपल्या पत्नीवर वारंवार अनैसर्गिक अत्याचारही केले. या घटनेने खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - अमरावती शहरातील गाडगेनगरातील माहेर असलेल्या पीडित पत्नीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दीपक (वय45, बजरंगनगर) याच्याविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबिक छळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. बुधवारी 7 डिसेंबरला रात्री पाऊणेदहाच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेने काय तक्रार दिली - अमरावती शहरातील बजरंगनगरात राहणाऱ्या दीपकशी काही वर्षांपूर्वी पीडित तरुणीचा विवाह झाला. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र, आरोपी पती काही वर्षांपासून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. तसेच नकार दिल्यावर त्याने तिला अनेकदा मारहाणही केली. इतकेच नव्हे तर नंतर त्याने तिच्या हातावर चटकेदेखील दिले. तसेच यासंदर्भात वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. हेही वाचा - भाजीत मीठ जास्त झाल्यानं आचाऱ्याला जागेवरच संपवलं, ढाबा मालकाच्या कृत्यानं पुणं हादरलं 3 डिसेंबरला रात्री साडे आठ वाजण्याच्यादरम्यान त्याने पत्नीशी भांडण केले. तसेच नातेवाईकांकडून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. हे पैसे आणले नाही तर बरं, नाहीतर तु काहीही कर, देहविक्रय कर; पण मला पैसे आणून दे, अशी धमकी तिला दिली. तसेच तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. यानंतर जीवाने मारण्याची धमकी देऊन त्याच दिवशी रात्रीदरम्यान घरातून हाकलून दिले. यानंतर पीडित तरुणीने रात्रभर उघड्यावर काढली. दरम्यान, घरातून हाकलून दिल्याने तिचे मामा- मामी तिला माहेरी घेऊन आले. तिने येथे भावाला सोबत घेऊन त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धावल घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिस उपनिरीक्षक विजय गरूड यांनी तिची लेखी तक्रार नोंदवून घेतली. यानंतर प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजश्री चंदापुरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.