जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुमच्या लाडक्या श्वानाचा पेट हाऊसमध्ये ठेवताय? हे जर माहित नसेल आहे मोठा धोका

तुमच्या लाडक्या श्वानाचा पेट हाऊसमध्ये ठेवताय? हे जर माहित नसेल आहे मोठा धोका

तुमच्या लाडक्या श्वानाचा पेट हाऊसमध्ये ठेवताय?  हे जर माहित नसेल आहे मोठा धोका

Tips for Pet Care : तुमच्या लाडक्या श्वानांची काळजी कशी घ्यावी याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 15 मे :  सध्या सर्वत्र शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत.  या सुट्ट्याच्या दिवसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक जण बाहेरगावी जाण्याच्या प्लॅन करत असतात. घरातील सर्वजण बाहेरगावी गेले तर पाळीव प्राण्याचं काय? हा प्रश्न तुम्हाला नक्की सतावत असेल. या प्राण्यांना काही दिवसांसाठी पेट हाऊस, पेट शेल्टरमध्ये ठेवण्याचा पर्याय निवडण्यात येतो. पण, हा पर्याय निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्याचा श्वानांवर मोठा परिणाम होऊ शकतो. काय घेणार काळजी? तुम्ही ज्या शेल्टर हाऊसमध्ये प्राण्यांना ठेवणार आहात तिथं  रेस्क्यू केलेले श्वान आहेत का? हे पहिल्यांदा तपासले पाहिजेत. कारण, या प्रकारच्या श्वानांसोबत पाळीव श्वान राहू शकत नाहीत. त्यांना संसर्गाचा मोठा धोका असतो. या दोन्ही श्वानांच्या राहणीमाणातही फरक आहे, त्यामुळे त्याचं भानं ठेवणं आवश्यक आहे, अशी माहिती नागपूरच्या सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापिकता स्मिता मिरे यांनी दिली.

News18लोकमत
News18लोकमत

ज्या ठिकाणी श्वानांचे लॉजिंग- बोर्डिंग व्यवस्था आहे तो परिसर स्वच्छ आणि स्वानांच्या राहण्यास अनुकूल आहे का ? प्राण्यांसाठी वातानुकुलित व्यवस्था आहे का?   श्वानांसाठी पिंजरा हा त्याचा आकारमानानुसार अनुकूल आणि योग्य आहे का ? या बारीकसारीक गोष्टींची तपासणी करणे आवश्यक आहे. आपण घरी कधी परत येणार हे आपल्याला माहिती असते. पण, प्राण्यांना त्याची कल्पना नसते. त्याचा परिणाम त्यांच्या स्वभावात आणि मानसिकतेमध्ये होते. त्यामुळे बऱ्याचदा पेट हाऊसमध्ये चांगली काळजी घेऊनही प्राण्याच्या स्वभावात आणि मानसिकतेमध्ये बदल होतो. ते अगदीच चिडचिडे किंवा शांत होतात. त्यामुळे प्राण्यांच्या स्वभावाची संपूर्ण कल्पना पेट हाऊस संचालकांना देणं आवश्यक आहे, असं मिरे यांनी सांगितलं. तुमचा श्वान हरवला तर लगेच सापडणार! मुंबईकर तरुणाची भन्नाट आयडिया पाहाच VIDEO लसीकरण आवश्यक तुम्ही श्वान ठेवणार आहात त्या ठिकाणी असलेल्या श्वानांचं लसीकरण झालं आहे का हे तपासणे आवश्यक आहे. प्रत्येक श्वानांच्या सवयी, खाण्याचे वेळा, खाद्यपदार्थ वेगळे असतात त्याची सविस्तर माहिती श्वानांची काळजी घेणाऱ्या संचालकांना देणं आवश्यक आहे, असं मिरे यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात