नागपूर, 21 जानेवारी : जगातील सर्वात वादाचा आणि प्रक्षोभक विषय हा जमिनी भोवतीच फिरतो. जगभरात जी युद्ध झाली त्यामागील एक महत्त्वाचे कारण जमीन हेच होते. 2050 पर्यंत कदाचित आपल्याकडे राहण्याजोगी अधिक पुरेशी जमीन देखील राहणार नाही. त्यामुळे जमिनीचा सुज्ञपणे वापर आणि योग्य मोजमाप होणे गरजेचे होते. त्यासाठी आजपासून सुमारे 200 वर्षांपूर्वी इतिहासात होऊन गेलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे काम करून फार मोठे योगदान दिले आहे. त्यांनी जमीन मोजण्यासाठी थिओडोलाइ उपकरणाचा वापर केला. अगदी तसेच उपकरण नागपुरात पाहायला उपलब्ध झाले आहे.
ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे ऑफ इंडियाचे जनक कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी केलेले भारतीय भूमापनाचे सर्वेक्षण आपण विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक कार्यांपैकी एक कार्य असे समजू शकतो.हे सर्वेक्षण मोठ्या साहसी व महत्त्वांशी संकल्पनेवर आधारलेली होते. 1802 मध्ये जनरल वेलस्ली यांच्या नेतृत्वाखाली विल्यम लॅम्बटन यांनी ती सत्यात उतरवली होती.
भारतीय उपखंडातील जमिनीचा नकाशा आणि मोजमाप करण्यासाठी हे वैज्ञानिक सर्वेक्षण केले गेले. ज्याला आपण त्रिकोणामितीय सर्वेक्षण या नावाने देखील ओळखतो. नागपूर आणि आग्रा या दिशेत दुसऱ्या टप्प्यात मोजमाप होत असताना 20 जानेवारी 1823 रोजी विल्यम लॅम्बटन त्यांचे वर्ध्यातील हिंगणघाट येथे अनपेक्षित रित्या मृत्यू झाला. यंदा त्या गोष्टीला 200 वर्षे पूर्ण होत असून आजही त्या स्मृती स्मारक रूपाने जपल्या गेल्या आहेत. या सर्व दरम्यान वापरण्यात गेलेल्या अशाच एका स्वरूपाचे दुर्मीळ थिओडोलाइट यंत्र वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेने जतन केले आहे.
थिओडोलाइ उपकरणाचा वापर
कर्नल विल्यम लॅम्बटन यांचा जन्म 1753 मध्ये उत्तरमध्ये यॉर्कशायरमधील नॉर्थ अलर्टनजवळ क्रासबेग्रेंज येथे शेतकरी कुटुंबात झाला. भारताचा नकाशा बनवण्याच्या दिशेने पहिले पाऊल मद्रास ते मंगलोरपर्यंतचे अंतर मोजण्याच्या योजनेने सुरू झाले असले तरी, संपूर्ण देशाच्या जमिनीची नोंद होईपर्यंत ते 1841 उजाडले. त्यांनी भारताचे मोजमाप करण्यासाठी थिओडोलाइ, उपकरण आणि झेनिथ सेक्टरचा वापर केला.
लॅम्बटनचे क्षयरोगामुळे निधन
त्रिकोणाच्या जमिनीवर उभ्या आणि क्षैतिज कोनांचे मोजमाप करण्यासाठी थियोडोलाइटचा वापर केला गेला. हे बारीक कॅलिब्रेटेड मायक्रोमीटर, सूक्ष्मदर्शक आणि आत्मा पातळीसह तयार केले गेले. यावेळी, देशाचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कन्याकुमारी हा प्रारंभ बिंदू होता. नागपूर आणि आग्रा या दिशेने मापन सुरू करण्यासाठी कर्नल विल्यम लॅम्बटननने जॉर्ज एव्हरेस्टला सहाय्यक म्हणून नियुक्त केले. 1822 मध्ये या प्रवासादरम्यान लॅम्बटनचे क्षयरोगामुळे निधन झाले. व नंतरच्या काळात मेरिडियनचा ग्रेट आर्क 1841 मध्ये पूर्ण झाला. त्याने सुमारे 1600 मैल व्यापले आणि जगात कुठेही मोजले जाणारे सर्वात मोठे मेरिडियन आर्क बनले.
भारताचा त्रिकोणमितीय सर्वेक्षण
कर्नल विल्यम लॅम्बटन हे पहिले सर्वेवर ऑफ इंडिया होते ज्यांनी भारताची सी लेवल शोधून काढली आणि सर्वेक्षणाच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले. या सर्वेक्षणाची सुरुवात चेन्नई पासून सुरुवात झाली. भारताचा त्रिकोणमितीय सर्वेक्षण त्यांनी केले मोजता मोजता त्यांनी आपला झिरो माईलपासून पुढचा प्रवास केला आणि दरम्यानच्या काळात ते हिंगणघाटपर्यंत आले असता हिंगणघाट येथे तब्बल तेरा वर्षे त्यांनी वास्तव केले दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला.
Nagpur : भलं मोठं झाड घरावर कोसळलं! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुटुंब बेघर Video
सर्वात प्राचीन भूगोल विभाग
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आजही हिंगणघाट येथे त्यांचे स्मारक आहे. या उपकरणामुळे अंतर आणि अँगल मोजायला मोठी मदत होते. आम्ही वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या मॉरिस विभागा कार्यरत आहोत ही मध्य भारतातील सर्वात जुनी संस्था आहे. ज्यात 1947 रोजी भूगोल विभाग सुरू करण्यात आला. मध्य भारतातील सर्वात प्राचीन भूगोल विभाग जो की मुंबई पुणे विद्यापीठाआधी अस्तित्वात आला.
दुर्मीळ यंत्र
उपकरण 1947 साली तयार केले आहे. इंग्लंड वरून विशेषता या विभागात तो आणला गेला आहे अतिशय दुर्मीळ हे यंत्र असून आपल्या विभागात दोन प्रकारचे थियोडोलाइट आहे. ज्यात मेड इन स्विझर्लंड असे अगदी सुरुवातीच्या काळातील दुर्मीळ संसाधने आमच्या विभागात आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक. डॉ. अविनाश तलमले यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.