नागपूर, 21 जानेवारी : राहते घर आपल्या डोळ्यांपुढे उद्ध्वस्त होताना पाहणं म्हणजे याहून मोठे दुःख तरी काय असू शकत ? असाच काहीसा प्रकार नागपुरातील कीर्तन गल्ली सीताबर्डी येथे राहणाऱ्या सेन कुटुंबीयांच्या बाबत घडला आहे. घराशेजारी असलेले भले मोठे लिंबाचे झाड घरावर कोसळलं आहे. यात घराचं मोठं नुकसान झालं असून कुटुंब रस्त्यावर आलं आहे. प्राशनाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील दखल घेतली नसल्यानं अखेर झाडं कोसळलं असल्याचा आरोप सेन कुटुंबीयाने केला आहे.
घराशेजारी असलेले भले मोठे लिंबाचे झाड कधी कोसळण्याच्या मार्गावर होते. संभाव्य धोका लक्षात घेता पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी तक्रार करून देखील त्यावर दुर्लक्ष केल्याने सेन कुटुंबीयांवर आज हे झाड भल्या मोठ्या संकटाच्या रूपाने कोसळले आहे. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नसली तरी आज हे बिऱ्हाड रस्त्यावर आले आहे. थोडी लापरवाही कुणाचा संसार उद्ध्वस्त करू शकते. सेन कुटुंबावर तीच वेळ उद्भवली असून यात दोष कुणाला द्यावा आणि दात कुणापुढे मागावी असा सवाल त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
आमच्या घराशेजारी फार जुने निंबाचे झाड होते. हे झाड कधीही कोसळण्याच्या अवस्थेत होते. संभाव्य धोका लक्षात घेता आम्ही वेळोवेळी नागपूर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार देखील केली. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. नुकतेच 20 ऑक्टोबर 2022 रोजी आम्ही लिखित स्वरूपात आणि ऑनलाइन स्वरूपात देखील तक्रार केली होती. मात्र. त्यावर कुठलीही दखल घेतली नाही.
पैसे नव्हते
प्रशासनाने हे झाड तोडावे अथवा आम्हाला तरी हे झाड तोडण्याची परवानगी द्यावी असे आमचे म्हणणे होते.मात्र आम्हाला यावर कुणीही मार्गदर्शन न करता केवळ टाळाटाळ करण्यात आले. अधिकारी लोक यायचे पैशाची मागणी करायचे मात्र आम्ही गरीब कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्ती असल्याने आमच्याकडे त्यांना द्यायला पैसे नव्हते.
Nagpur : प्रसूती काळात घ्या विशेष काळजी, 'या' कारणामुळे वाढतायत बालमृत्यू, Video
सामान उघड्यावर
आज आम्हाला राहायला घर देखील नाही.आमचे सामान उघड्यावर पडले आहे आज आमच्या घरावर केवळ झाड कोसळले नसून दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे याबाबत आम्ही कुणाकडे दाद मागावी आणि कुणापुढे तक्रार करावी काही कळत नाही.
6 व्यक्तींचे कुटुंब
वेळीच जर या बाबीकडे लक्ष दिल्या गेलं असतं तर आमच्या कुटुंबावर एवढे मोठे संकट कोसळले नसतं.आम्ही आज मोठ्या अडचणीत पडलो असून सहा व्यक्तींचं हे एक बिऱ्हाड आज रस्त्यावर आले आहे. सर्व यंत्रणा पुढे मी हतबल आहे, अशी आर्थ भावना कुटुंबातील प्रमुख महेश सेन यांनी बोलताना व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.