नागपूर, 19 जानेवारी : मातृत्वाच्या आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे गर्भावस्थेची नऊ महिने पूर्ण झाले की होणारा बाळाचा जन्म होय. मात्र, मोठ्या आशेने व काळजीने पोटात सांभाळ केलेल्या बाळाचा जन्म दुर्दैवाने काही मातांसाठी अवघ्या काही क्षणांचा ठरला आहे. गेल्या वर्षभरात नागपुरात जन्माला आलेल्या एकूण 73 हजार 115 बालकांपैकी 7,770 बालके कमी वजनाची भरली आहेत. बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शासन दरबारी वेगवेगळ्या योजनांचा भडिमार आणि कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो, अंमलबजावणी केली जाते. मात्र, असे होत असताना एकट्या नागपूर शहर व नागपूर ग्रामीण मिळून एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत 73 हजार 115 बालके जन्माला आली. यातील शून्य ते पाच वर्षाखालील 1.72% म्हणजे 1259 बालकांचा मृत्यू झाला आहे. 106 बालकांचा मृत्यू नागपुरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत 57 हजार 851 बालकांचा जन्म झाला. त्यातील शून्य ते पाच वर्षाखालील 1153 बालकांचा मृत्यू झाला आहे.त्यात महापालिकेच्या अंतर्गत 491 मृत्यूची नोंद आहे. तर ग्रामीणमध्ये 15,264 बालके जन्माला आली त्यातील 106 बालकांचा मृत्यू झाला आहे.
मातेचेही वजन महत्त्वाचे शून्य ते पाच वर्ष वयोगटातील लो बर्थ वेट हे बालमृत्यूचे कारण अनेक विकसित देशाप्रमाणे भारत सारख्या विकसनशील देशात देखील बघायला मिळत आहे. बाळ पोटात असताना मातेला होणारे आजार संक्रमण तसेच मातेचे पोषण प्रसूती काळात कसे होते, हे देखील बघणे गरजेचे असते. माता जर कमी वजनाची असेल तर यामुळे देखील मुलांचे वजनात घट होऊ शकते. Wardha : पालकांनो, मुलांची काळजी घ्या! न्युमोनिया, डायरियाचा धोका वाढला योग्य आहार महत्त्वाचा बाळ जन्मल्यानंतर आईचे दूध हे एकमात्र खाद्य अत्यंत आवश्यक आहे. पुढे बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर आहार म्हणून ज्याला आपण सप्लीमेंट्री आहार म्हणतो ते पूरक योग्य प्रमाणात देणे अतिशय गरजेचं असतं अन्यथा अतिसार, उलट्या यासारखे आजार या दरम्यान होऊ शकतात. तसेच नेहमी सर्दी खोकला सारख्या आजारामुळे बाळाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन इतर आजारामध्ये बाळाचा मृत्यू होऊ शकतो. हे सर्वसाधारणतः शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालमृत्यूची कारणे आहेत. बाळाच्या वाढीसोबत देण्यात येणारे लसीकरण महत्त्वाचे असते. बाळाला देण्यात येणारे सर्व प्रकारच्या लस सरकारी इस्पितळात मोफत उपलब्ध आहेत. ती वेळेत देणे अतिशय आवश्यक असतात.