जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पावसाळ्यात असतो गॅस्ट्रोचा धोका, पाहा लक्षणे आणि उपाय, Video

पावसाळ्यात असतो गॅस्ट्रोचा धोका, पाहा लक्षणे आणि उपाय, Video

पावसाळ्यात असतो गॅस्ट्रोचा धोका, पाहा लक्षणे आणि उपाय, Video

पावसाळ्यात असतो गॅस्ट्रोचा धोका, पाहा लक्षणे आणि उपाय, Video

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या गॅस्ट्रो आजारापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी. पाहा काय आहेत उपाय आणि लक्षणे?

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 20 जुलै: पावसाळ्यात अनेक साथीच्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. याच दिवसात प्रामुख्याने उद्भवनारा आजार म्हणजे गॅस्ट्रो हा होय. दूषित पाणी किंवा अन्नपदार्थांच्या सेवनाने हा आजार उद्भवत असतो. या आजारामध्ये पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तो लहान मुलांमध्ये देखील आढळून येतो. गॅस्ट्रो आजारापासून बचाव व्हावा यासाठी काय खबरदारी घेतली जावी आणि या आजाराची प्राथमिक लक्षणे काय आहेत? यबाबात नागपुरातील गॅस्ट्रो एन्टेरोलॉजिस्ट डॉ. मयुर गट्टानी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात. गॅस्ट्रो होण्याची कारणे पावसाळ्याच्या दिवसात अनेक साथीचे आजार उद्भवत असतात. त्यातील एक आजार म्हणजे गॅस्ट्रो हा देखील आहे. या आजारात प्रामुख्याने पोटाशी संबंधित त्रास होत आहे. त्यात ऍसिडिटी, अजीर्ण, फ्लोटींग, कष्ट बद्धता, उलटी जुलाब, ताप, पोट दुखणे इत्यादी त्रास होत असतो. हा आजार बहुतांश वेळी बाहेरचे खाल्ल्याने अथवा दूषित पाणी पिल्याने होणारा आजार आहे. बाहेरच्या खाण्याने हा आजार का होतो हा मुख्य प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर असे की पावसाळ्याच्या दिवसात ह्युमिडिटी वाढत असते. त्यामुळे बरेच किटाणू जिवाणू आणि बुरशी सारखे घटक हे अन्नात किंवा पाण्यात मिसळून दूषित झालेले असतात. यामुळे गॅस्ट्रोचा आजार वाढत असतो, असे डॉक्टर सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

आजारापासून बचावासाठी ही घ्यावी काळजी दैनंदिन जीवनातील वापरात बाहेरून आणलेला भाजीपाला स्वच्छ धुऊन घ्यावा. तसेच फ्रीजमधून काढल्यानंतर देखील तो परत एकदा घुवून घेतला पाहिजे. शक्यतोवर भाज्या उकळून खाल्ल्या पाहिजेत. घरातील शुद्ध पाण्याचे प्युरिफिकेशन नसल्यास पाणी उकळून पिले पाहिजे. तसेच बाहेरचे पदार्थ खात असताना तेथील पदार्थ उघड्यावर तर नाही ना आणि स्वच्छतेची योग्य ती खबरदारी घेतली आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे. काय आहेत लक्षणे? काही खाल्ल्यानंतर जुलाब होणे किंवा उलटी होणे ही गॅस्ट्रोची लक्षणे दिसत असली तरी पाणी पिणे थांबवू नये. इलेक्ट्रॉल पावडर घातलेले पाणी किंवा लिंबू-साखर घातलेले पाणी प्यावे. असे पाणी घोट घोट पित राहावे. प्रत्येक रुग्णाला गॅस्ट्रो या आजारात तीव्र लक्षणे दिसून येत नाहीत. काहींना पोटात मुरडा येऊन दिवसाला दोन ते तीन जुलाब आणि आणि एखादी उलटी होते. जुलाब, उलटय़ा ही लक्षणे तीव्र स्वरूपात दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आला पावसाळा, पोटाला सांभाळा, कशी घ्या काळजी? नाहीतर… Video लहान मुलांसाठी घ्यावी खबरदारी लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यांना गॅस्ट्रो हा आजार झाल्यास खूप त्रास सहन करावा लागतो. या आजारात अतिसार व उलटी होत असल्याने शरीरातील पाणी कमी होते. यातून अशक्तपणा वाढतो. लहान मुले शाळेत किंवा बाहेर खाण्याकडे लक्ष देत नाहीत. खाण्यापूर्वी हात धुण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे लहान मुलांच्या खाण्या-पिण्याकडे अधिक कटाक्षाने लक्ष द्यावे. या आजारांच्या बचावासाठी योग्य ती खबरदारी घेतली तर संभाव्य आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, अशी माहिती गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मयुर गट्टानी यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात