जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur : जलतरणपटूंचे 3 वर्षांपासून हाल, पाहा काय आहे कारण Video

Nagpur : जलतरणपटूंचे 3 वर्षांपासून हाल, पाहा काय आहे कारण Video

Nagpur : जलतरणपटूंचे 3 वर्षांपासून हाल, पाहा काय आहे कारण Video

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंना घडवणारा कामगार कल्याण मंडळाचा जलतरण तलाव सध्या बंद आहे.

  • -MIN READ Local18 Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 28 डिसेंबर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंना घडवणारा कामगार कल्याण मंडळाचा जलतरण तलाव सध्या बंद आहे. तलावाच्या दुरुस्तीचे काम निधी अभावी सलग तिसऱ्या वर्षी रखडले आहे. यंदा उन्हाळापर्यंत या जलतरण तलाव दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे जलतरणपटूंना यंदा सलग तिसऱ्या उन्हाळ्यात जलतरणाचा आनंद घेण्यापासून अलिप्त राहावे लागणार आहे.   शहरातील सर्वात मोठा जलतरण तलाव असलेल्या आणि कामगार वर्गातील मुलांसाठी अल्प दरात लाभ घेता येणारा हा जलतरण तलाव लवकर पूर्ववत सुरू व्हावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. 2020 मध्ये करोना कालावधीत हा तलाव बंद ठेवण्यात आला होता. तेव्हापासून हा तलाव आजतागायत बंदच आहे. तलावातील पाणी काढल्यानंतर असे लक्षात आले की तलावाचे फ्लोरिंग व आजूबाजूला टाइल्स उखडल्या आहेत व इतरही कामांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तलावाच्या दुरुस्ती संदर्भात प्रस्ताव कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यात आला. मात्र अद्याप त्यावर कुठलेही काम झालेले नाही. शहरात मोजकेच जलतरण तलाव आहे. त्यात दक्षिण नागपुरातील कामगार कल्याण मंडळाचा हा जलतरण तलाव जलतरणपटूंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बारावी पास रँचोची कमाल, YouTube चा वापर करून बनवले हेलिकॉप्टर, Video राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सोबतच कामगारांची मुले येथे सरावासाठी येत असतात. आज सलग तिसऱ्या वर्षात देखील या तलावाचे काम पूर्ववत न झाल्याने जलतरणपटूंची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर मार्ग काढून जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे अशी मागणी माजी उपमहापौर सतीश होले यांनी केली आहे. फ्लोरिंगच्या टाइल्स निघाल्या करोना काळात आयुक्तांच्या सूचनेनुसार कामगार कल्याण जलतरण तलावातील पाण्याचा निचरा करण्यात आला होता. पाणी निघाल्याने जलतरण तलावातील कडेच्या आणि फ्लोरिंगच्या टाइल्स निघाल्या असल्याचे निदर्शनात आले. त्यांची दुरुस्ती वेळेत करणे हे अनिवार्य असल्याचे लक्षात येतात जलतरण तलाव लवकर सुरू करणे सोयीचे झाले नाही. दरम्यानच्या काळात दोन वर्ष हे करोना काळात निघून गेले. तलावाची  डागडुजी करून तलाव लवकर सुरू व्हावा यासाठी अनेक स्तरावर आम्ही प्रयत्न केले. काम लवकरच सुरू होणार   नागपूर शहरातील सर्वात मोठा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंना घडवणारा हा जलतरण तलावाचे महत्त्व लक्षात घेता तलावाच्या दुरुस्तीसाठी आम्ही फॉलो अप घेतला. सन्माननीय कामगार विभागाच्या सूचनेनुसार सदर काम हे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून केल्यास योग्य वेळेत आणि उत्तम दर्जाचे काम पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून करण्याचे ठरवले होते.   आताचा जर विचार केला तर कामगार मंत्री सुरेश खाडे हे कामगार कल्याण मंडळात आयोजित नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांनी तलावाच्या दुरुस्तीसाठी पावणेदोन कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या तलावाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती कामगार विकास अधिकारी प्रतिभा भाकरे यांनी दिली. बूट घेण्याची परिस्थिती नसतानाही तो धावला, सौरभनं देशासाठी पटकावलं सुवर्णपदक! अनेकांनी जलतरण करणे सोडलं नागपूर शहरात सर्वात मोठा जलतरण तलाव असलेल्या कामगार कल्याण मंडळाचा जलतरण तलावात सराव करणाऱ्या जलतरणपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा तलाव दुरुस्तीच्या कारणाने बंद आहे त्यामुळे जलतरणपटूंची मोठी गैरसोय होऊन त्यांना इतर पर्याय शोधावे लागत आहे. मात्र सर्वांच्याच खिशाला परवडणारे इतर जलतरण तलाव नसल्याने अनेकांनी जलतरण करणे सोडून दिले आहे. त्यामुळे सदर जलतरण तलाव दुरुस्तीचे काम लवकरात लवकर व्हावे अशी एक क्रीडा प्रशिक्षक म्हणून माझी विनंती आहे अशी भावना क्रीडा प्रशिक्षक संजय बाटवे यांनी व्यक्त केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nagpur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात