औरंगाबाद, 28 डिसेंबर : उपलब्ध वस्तूंवर संशोधन करून नवं उपकरण तयार करणारा थ्री इडियट्स सिनेमातील रँचो सर्वांना माहिती आहे. सोशल मीडिया आणि त्यातही यूट्यूबरील व्हिडीओ पाहून गावागावातील रँचोंच्या कल्पनांना बळ आलंय. औरंगाबादच्या एका रँचोनं यूट्यूबचा वापर करून थेट हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. काय आहे प्रयोग? औरंगाबादच्या शासकीय आयटीआयमध्ये शिकत असलेल्या सतीश मुंडे असं या रँचोचं नाव आहे. त्यानं जुन्या कारच्या साहित्यामधून हेलिकॉप्टर बनवलं आहे. सतीश मुंडे हा मूळचा परळी येथील असून तो कुटुंबीयांसोबत वाळूज भागात राहतो. त्याचे वडील कंपनीत काम करतात तर आई गृहिणी आहे. त्याला एक भाऊ आहे. सतीशला लहानपणापासूनच हवेत उडणाऱ्या वस्तूबद्दल कुतूहल होतं लहानपणापासूनच आपण हेलिकॉप्टरमध्ये बसावं असं त्याची इच्छा होती. मात्र , आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला शक्य झालं नाही मात्र तो इथेच थांबला नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने एका कंपनीत काम केलं. त्या कंपनी मधून मिळणारे पैसे त्याने साचवले. तीन वर्षात साचलेल्या पैशांमधून त्यांनी एका मारुती कारचे इंजन विकत घेतलं. त्यासोबत इतर साहित्य घेतलं आणि थेट हेलिकॉप्टर बनवायला सुरुवात केली.
इंटरनेटची मदतीने हेलिकॉप्टर तयार हेलिकॉप्टर बनवायचे स्वप्न जरी असलं तरी मात्र त्याबद्दल तांत्रिक शिक्षण नव्हतं किंवा त्याबद्दल माहिती नव्हती. मात्र असं असलं तरी सोशल मीडियाचा वापर करून त्याने हेलिकॉप्टर बनवण्याचे अनेक व्हिडिओ बघितले. त्यातून हेलिकॉप्टर बनवण्यासाठी मदत झाली. हे तयार करण्यासाठी त्याला अडीच ते तीन लाखांपर्यंत खर्च आला आहे. सहावीतल्या मुलींनी अंधांसाठी केलं मोठं काम, वाचून वाटेल अभिमान! स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज हेलिकॉप्टर बनवायचे स्वप्न असल्यामुळे कंपनीत काम करून त्यांनी हेलिकॉप्टर तयार केलं मात्र त्याचं अर्धवट काम पूर्ण झाला आहे त्याला पुढील कामासाठी आर्थिक अडचणी असल्यामुळे त्यांनी ते काम थांबून आहे . हेलिकॉप्टरचा पुढील काम पूर्ण करण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी त्याला मदत करून त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली तर तो आर्थिक मदत स्वीकारण्यासाठी तयार आहे. सतीशने तयार केलेलं हेलिकॉप्टर रेल्वे स्टेशन परिसरातील आयटीआयमध्ये सर्वांना पाहता येते.
अशी करा सतीशला मदत सतीश हा वाळूज परिसरामध्ये राहतो. त्याचा मोबाईल क्रमांक 90 96 57 96 91 असा आहे. सतीश ला स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही त्याला संपर्क साधून आर्थिक मदत करू शकता.

)







