मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : मोकाट कुत्र्यांना अन्न भरवताना घ्यावी लागणार काळजी, पालिकेचा मोठा निर्णय

Nagpur : मोकाट कुत्र्यांना अन्न भरवताना घ्यावी लागणार काळजी, पालिकेचा मोठा निर्णय

महापालिकेने श्वानप्रेमी, पशुप्रेमी संस्था आणि नागरिकांना अन्न ठिकाण चिन्हांकित करण्यासाठी माहिती मागवली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 25 नोव्हेंबर : शहरातील मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आता अन्न खाऊ घालण्याचे ठिकाणं चिन्हांकित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नागपूर  महानगर पालिकेद्वारे शहरात अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महापालिकेने  श्वानप्रेमी, पशुप्रेमी संस्था आणि नागरिकांना अन्न ठिकाण चिन्हांकित करण्यासाठी माहिती मागवली आहे. या माहितीच्या आधारे ठिकाणं सुनिश्चित केली जाणार आहेत. 

शहारत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कायम चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशानुसार नागपूर महानगर पालिका उपाययोजना राबवित आहे. मोकाट कुत्र्यांना शहरांतील पशू प्रेमी, श्वान प्रेमी मार्फत जे अन्न खाऊ घालण्यात येत त्या संबंधित माहिती श्वान प्रेमीनी नागपूर महानगर पालिकेला सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या माहितीत आपण आपल्या सोयीनुसार फीडींग करणाऱ्यांचे नाव,  वेळ आणि सोयीची जागा, किती कुत्र्यांना खाऊ घालत आहेत याची माहिती आवश्यक आहे.

असे ठरणार ठिकाण

प्रशासन संबंधित जागेची पाहणी करून त्या परिसरात राहणाऱ्या लोकांची काही तक्रार आहे का, याबाबतची माहिती जाणून घेणार आहे.  तसेच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ॲक्ट 2016 नुसार करण्यात आलेल्या नियमांवलीचे पालन होईल याबाबत लक्ष देणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून शहरांमध्ये मोकाट श्वानांकरिता डॉग फिडिंग स्पॉट तयार करण्यात  येणार आहेत, अशी माहिती उपयुक्त आणि घनकचरा विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली. 

महानगरपालिकेला वाहतुकीचा सल्ला द्या आणि जिंका तब्बल 20 लाख रुपये!

मुंबई पोलीस कायदा 1951 सेक्शन 44 अंतर्गत पोलिसांना कारवाई करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे. मात्र, कारवाई  जबरदस्ती न राहता तपास करून नागपूर महानगरपालिकेच्या हाती सुपुर्द करण्यात यावी या स्वरूपाची असावी या उद्देशाचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने पोलीस विभागाला दिले आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव संदर्भात तक्रार आल्यास पोलीस विभागाकडून कारवाई व्हावी, असे दिशा निर्देश उच्च न्यायालयाने पोलीस विभागांना दिले आहेत, अशी माहिती डॉक्टर गजेंद्र महल्ले यांनी दिली. 

First published:

Tags: Local18, Nagpur