मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : पाळीव कुत्र्यांची नसबंदी करा, नाहीतर…; काय आहे पालिकेचा नियम? पाहा Video

Nagpur : पाळीव कुत्र्यांची नसबंदी करा, नाहीतर…; काय आहे पालिकेचा नियम? पाहा Video

X
नागपूर

नागपूर शहरात श्वान पाळायचे असल्यास नागपूर महानगर पालिकेद्वारे परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नागपूर शहरात श्वान पाळायचे असल्यास नागपूर महानगर पालिकेद्वारे परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 28 नोव्हेंबर : नागपुरात  पाळीव श्वानांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. नागरिकांना देशी श्वानांसाठी 200 तर विदेशी प्रजातींच्या श्वानांच्या नोंदणीसाठी 500 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, यात देशी श्वानांना पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून नसबंदी केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास शुल्क पूर्णपणे माफ केला जाणार आहे. 

नागपूर शहरात श्वान पाळायचे असल्यास नागपूर महानगर पालिकेद्वारे परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशी श्वानांना पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून यात सवलत देण्यात आली आहे. विदेशी श्वान पाळायचे असल्यास 500 तर देशी श्वान पाळायचे 200 रुपये प्रतिवर्ष शुल्क भरावे लागणार आहेत. भारतीय श्वान पाळायचे असेल आणि त्यांची नसबंदी झाली असेल तर त्या भारतीय श्वानाच्या शुल्कात पूर्णतः मुक्तता देण्यात आली आहे. श्वानांची संख्या मर्यादित राहावी यासाठी इंडियन श्वान व्यतिरिक्त इतर ब्रिडचे, विदेशी श्वान पाळण्यासाठी श्वानाची नसबंदी केली असल्यास शुल्कात सूट देण्यात आली आहे. अशा प्रसंगी 500  ऐवजी प्रतिवर्ष 200 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

ॲंटी रेबीजचे नोंदणीकृत प्रमाणपत्र

नागपूर महानगर पालिकेच्या दहाही झोन कार्यालयात नागरिकांना मुख्य स्वच्छता अधिकारी, विभागीय अधिकाऱ्यांकडे नोंदणी करता येणार आहे. तसेच पंधरा दिवसांच्या आत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने घरून देखील श्वानांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. श्वानांच्या तक्रारीही नागरिकांना याच कार्यालयात मुख्य स्वच्छता अधिकारी, विभागीय अधिकाऱ्यांशिवाय सहायक आयुक्तांकडे करता येणार आहे.

नोंदणीसाठी कागदपत्रे

श्वानांची नोंदणी करताना, श्वान मालकांचे ओळखपत्र, राहत्या घराचा दाखला यासह पशुवैद्यकाकडून ॲंटी रेबीजचे नोंदणीकृत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. एका कुटुंबाला जास्तीत जास्त तीन श्वानांची नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करताना देशी श्वान पाळणाऱ्यांनी श्वानाची नसबंदी करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र सादर केल्यास 200 रुपये वार्षिक शुल्क माफ करण्यात येणार आहे. हीच अट विविध प्रजातीच्या विदेशी श्वानांसाठी असून त्यांना तीनशे रुपयांची सवलत देण्यात येणार असून केवळ प्रतिवर्ष दोनशे रुपये भरावे लागणार आहे.

मोकाट कुत्र्यांना अन्न भरवताना घ्यावी लागणार काळजी, पालिकेचा मोठा निर्णय

ना हरकत प्रमाणपत्र

तीन श्वानांपेक्षा कमी श्वान पाळल्यास आजूबाजूच्या लोकांचे ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. मात्र तीन पेक्षा जास्त श्वान पाळण्यास आजूबाजूच्या नागरिकांची नाहरकत प्रमाणपत्र ( एनओसी) घेणे गरजेचे आहे. तसेच देशी श्वान तीन पेक्षा जास्त असेल मात्र त्यांची नसबंदी केली असेल तर ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र, श्वानांसाठी पुरेशी जागा व्यवस्था आणि क्षमता असल्याचे पुरावे नोंदणी करताना जोडावे लागेल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.   

First published:

Tags: Local18, Nagpur