जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur Murder : नागपुरात चाललंय तरी काय? तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Nagpur Murder : नागपुरात चाललंय तरी काय? तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Nagpur Murder : नागपुरात चाललंय तरी काय? तिहेरी हत्याकांडाने खळबळ

नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 14 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात गेल्या 24 तासात दोघांची हत्या झाली होती. तर यानंतर आता नागपुर ग्रामीणमध्ये तिसरी हत्येची घटना बुटीबोरी येथे घडली आहे. नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. तर पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली. तिसरी घटना जिल्ह्यातील बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीस खबऱ्या असल्यावरून दोघांनी सुनील भजे नावाच्या व्यक्तीची हत्या केली. महत्वाचे म्हणजे तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील हत्येची पहिली घटना इमामवाडा भागात घडली. रामसिंग ठाकूर असे मृत इसमाचे नाव आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे. मृत रामसिंग ठाकूर आणि आरोपी राजू बुरडे मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यावर वार केले. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हेही वाचा -  नागपूर : खेळता-खेळताच जीव गमावला; क्षणभराचा आनंद 5 वर्षीय रियांशच्या जीवावर बेतला तर हत्येची दुसरी घटनाही पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोशन शंकर बिहाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास तिघांनी चाकु आणि लोखंडी रोड रोशनवर हल्ला केला. ज्यामध्ये रोशनचा मृत्यू झाला आहे.  आरोपी वीरेंद्र. यशोदास आणि अश्विन या तिघांसोबत रोशनचा तिघांसोबत वाद सुरू होता. त्याच वादातून  तिघांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. हत्येची तिसरी घटनाही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात झाली आहे. सुनील गुलाबराव भजे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी लोखंडी रोडने हल्ला करून त्यांची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ दादू मांजी असे आरोपींचे नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या तिहेरी हत्याकांडानंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात