जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गडकरींच्या धमकीमागं आरएसएस कनेक्शन; पुजारीच्या दाव्यानं खळबळ

गडकरींच्या धमकीमागं आरएसएस कनेक्शन; पुजारीच्या दाव्यानं खळबळ

नितीन गडकरी धमकी प्रकरणात  खळबळजनक खुलासा

नितीन गडकरी धमकी प्रकरणात खळबळजनक खुलासा

नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जयेश पुजारी याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 14 एप्रिल :  काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात फोन करून खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. दहा कोटींची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारू अशीही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी जयेश पुजारी याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटचे नेते असल्यामुळे जयेशने त्यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. म्हणून गडकरींना लक्ष्य केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. नितीन  गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटचे नेते असल्यामुळे जयेशने त्यांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर त्याने कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या हत्येची देखील सुपारी घेतली असल्याचं तपासात समोर आलं आहे. तुरुंगात सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी दरमहा चार ते पाच लाख रुपये दहशतवादी संघटनांकडून जयेशला मिळत असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नेमकं काय आहे प्रकरण?  काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला होता. फोन करून खंडणी मागण्यात आली होती. तसेच एक मोबाईल नंबर देखील देण्यात आला होता. पैसे त्या खात्यात टाका असं सांगण्यात आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी जयेश पुजारी याला कर्नाटकमधून ताब्यात घेतलं आहे. त्याने यापूर्वी देखील नितीन गडकरी यांना धमकी दिली होती. विशेष म्हणजे तो कारागृहात असताना त्याच्या नावाने धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात