विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 21 एप्रिल: गडचिरोली- भामरागड सारख्या दंडकारण्यातील जनजीवन आजही नक्षलवाद्यांच्या दहशतीने ग्रासलेले आहे. आजही हा भू-भाग विकास, पायाभूत सेवा-सुविधांपासून कोसो दूर आहे. बंदुकीच्या धाकावर नक्षलवाद्यांच्या अन्याय, अत्याचाराच्या घटना इथे घडत असतात. अशीच एक दुर्दैवी घटना भामरागड तालुक्यातील मरदूर गावात घडली आहे. पोलीस भरतीत भाग घेतला म्हणून साईनाथ चौतू नारोटी या विद्यार्थ्याची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. तसेच या विरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांना पत्रकाद्वारे धमकी दिली आहे. साईनाथला व्हायचे होते अधिकारी भामरागडमधील मरदूर यथे राहणाऱ्या साईनाथ नारोटी या विद्यार्थ्याची घरची परिस्थिती हालाखिची आहे. त्याला प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. तसेच त्याने पोलीस भरती देखील दिली होती. मात्र, आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन चांगले जीवन निवडण्याऐवजी नक्षलवादाचा मार्ग पत्करावा, असा नक्षलवाद्यांचा अट्टहास असतो. त्यासाठी साईनाथवर पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आरोप करत त्याची हत्या करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांना धमकी साईनाथच्या हत्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांनी आवाज उठवला. यावर नक्षलवाद्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) दण्डकारण्य पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने प्रसिद्धी पत्रक काढले. यामध्ये जन संघर्ष समितीचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांच्यावर टीका केली आहे. तसेच आम्ही कुणालाही शिक्षा केली की दत्ता शिर्केसारखे बुद्धीजीवी लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या जाळ्यात फसू नका, असा धमकीवजा इशारा श्रीनिवास याने दिला आहे. भामरागडमध्ये नक्षलवाद्यांची दहशत साईनाथ नरोटी याचे गाव असणाऱ्या भामरागड तालुक्यातील मरदूर परिसरात नक्षलवाद्यांची दहशत आहे. त्यामुळे या परिसरातील कोणीही साईनाथच्या हत्येविरोधात आवाज उठवू शकले नाही. मात्र, सुशिक्षित आदिवासी तरुणाच्या हत्येविरोधात सामाजिक कार्यकर्तेदत्ता शिर्के यांनी आवाज उठवला. तसेच साईनाथच्या खुन्यांना शिक्षा द्याावी, अशी मागणी शिर्के यांनी केली आहे. लग्न होत नसल्याने 48 वर्षीय पुरूषाचा मोठा निर्णय, तृतीयपंथीयासोबत सात फेरे, पाहा PHOTOS देविदास गावडेचा नक्षलवाद्यांना पुळका साईनाथचा खून करून गप्प बसलेले नक्षलवादी देविदास गावडेला पोलिसांनी अटक करताच पुढे आले. साईनाथचा खून आम्हीच केल्याचे पत्रकातून सांगू लागले. म्हणजे पूर्वाश्रमीचा नक्षलवादी असलेला देविदास गावडे याचा नक्षल्यांना अचानक पुळका आला आहे. नक्षल्यांच्या या कृत्याची वास्तविकता आम्ही समाजापुढे आणणार आहोत आणि साईनाथ सारख्या निरपराध लोकांसाठी अधिक जोमाने लढा देणार आहोत. शासनाने यावर त्वरित कारवाई करून साईनाथच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि मृत साईनाथच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी दत्ता शिर्के यांनी केली.

)







