नागपूर, 15 जून : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून गांधी कुटुंबीयांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. सोमवारपासून राहुल गांधींची (Rahul Gandhi) ईडी चौकशी करत आहेत. राहुल गांधींच्या चौकशीचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान सोमवारी ईडीच्या कारवाईविरोधात संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अशाच प्रकारे नागपूर (Nagpur) येथीही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या काँग्रेस नेत्याची जीभ घसरली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. नागपुरात ईडीच्या विरोधात आंदोलन करताना नागपूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसैन (Congress leader Sheikh Hussain) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधान केलं. शेख हुसैन यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ सुद्धा समोर आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
FIR registered against Maharashtra Congress leader Sheikh Hussain at Gittikhadan PS in Nagpur for using derogatory language against PM Modi. FIR registered last night u/s 294 (obscene acts and songs) and 504 IPC (intentional insult with intent to provoke breach of the peace).
— ANI (@ANI) June 15, 2022
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने शेख हुसैन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी काल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात आपत्तिजनक विधान केले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी आज गिट्टीखदान पोलीस स्टेशचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले. 1/2@narendramodi pic.twitter.com/sGefWou2Gs
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 14, 2022
जर पोलिसांनी शेख हुसैन यांच्याविरोधात कारवाई करत अटक केली नाही तर भाजप सुद्धा आंदोलन करेल असा इशाराच भाजप नेत्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे अमरावतीमधील बडनेरा पोलीस स्टेशनमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेख हुसैन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वाचा : ‘मुख्यमंत्री कार चालवतात अन् सरकार देवाच्या भरवश्यावर चाललंय’ जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल शेख हुसैन यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर करताना दिसून येत आहेत. मोदींवर टीका केल्यावर शेख हुसैन याांनी पुढे म्हटलं, कदाचित मला यासाठी ईडीकडून 1000 नोटीसा मिळतील. पण मला पर्वा नाही. आम्ही लढत आलो आणि लढत राहू.