जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BJP Jal Akrosh Morcha: मुख्यमंत्री सरकार नाही कार चालवतात, देवाच्या भरवश्यावर सरकार चाललंय - देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

BJP Jal Akrosh Morcha: मुख्यमंत्री सरकार नाही कार चालवतात, देवाच्या भरवश्यावर सरकार चाललंय - देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

'मुख्यमंत्री कार चालवतात अन् सरकार देवाच्या भरवश्यावर चाललंय' जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल

'मुख्यमंत्री कार चालवतात अन् सरकार देवाच्या भरवश्यावर चाललंय' जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanavis: भाजपच्या वतीने आज जालन्यात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 15 जून : जालन्यात प्रचंड पाणी टंचाई असून नागरिकांना तब्बल 15-15 दिवसांनी पाणी मिळत आहे. पाणी प्रश्नावरुन भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा (BJP Jal Akrosh Morcha in Jalna) काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात मंचावरुन भाषण करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला एका पत्रकाराने विचारलं, हे सरकार कसं चाललं आहे? मी सांगितलं, सरकार चाललं कुठेय? मुख्यमंत्री कार चालवतात आणि भगवान सरकार चालवत आहेत. ईश्वर भरोसे सरकार सुरू आहे. आज माझ्या लक्षात आलं, खरंच ईश्वर भरोसे आहे. आम्ही पाणी मागण्यासाटी निकालो… मुख्यमंत्र्यांनी तर पाणी दिल नाही. ईश्वराने पाणी दिलं म्हणाले, बिचारे ऊन्हात बसले आहेत थोडं पाणी शिंपडून द्यावं. हा भाजपचा मोर्चा नाहीये. जालनेकरांचा आक्रोश या मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर आला आहे. माझ्या सामान्य माता-भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. मडकी डोक्यावर घेऊन तीन तास रस्त्यावर चालत होत्या. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता की, कधीतरी थेंब भर पाणी आमच्या नळाला मिळेल का? या जालन्यात आम्हाला पाणी पहायला मिळेल का? ही अवस्था जालनाची का झाली? हा सवाल विचारावा वाटतो.

जाहिरात

मला आठवतंय, रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेत्रृत्वात शिष्टमंडळ आलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, जालन्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी सांगितल्यावर त्यांनी प्रस्ताव तयार केला. एका दिवसाचा विलंब न लावता 129 कोटी रुपये जालन्याच्या पाणी पुरवठ्यासाठी त्यावेळी दिले. दुर्दैवं असं की अडीच वर्षात ही योजना पुढे गेलीच नाही. वाचा :  पाण्यासाठी भाजपचा जालन्यात जलआक्रोश, “जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे” चा मोर्चात नारा जे आपल्याकाळात झालं, सरकार गेलं आणि नवीन सरकारमध्ये सर्व ठप्प झालं. या सरकारला एकच गोष्ट करता येते, चालू असलेल्या कामांना स्थगिती आणि आपल्या सरकारच्या कामांचं उद्घाटन. हे स्वत: काही करत नाही आणि आपण केलेलं पूर्ण होऊ देत नाही. आज मला एका पत्रकाराने विचारलं 129 कोटी रुपये खर्च नाही झाले तर तुम्ही काय कराल? मी म्हटलं, त्यांच्या पक्षाला विचारा, मुख्यमंत्र्यांना विचारा… 129 कोटी रुपये दिल्यानंतर जालनेकरांच्या नळाला पाणी येत नसेल तर तुम्हाला राज्यसर्ते म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? हा सवाल त्यांना विचारा मला विचारु नका. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचं तर ठरंल आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. या जनतेसाठी संघर्ष करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. जिथे जिथे जलआक्रोश आहे तिथे तिथे भारतीय जनता पार्टी आहे. औरंगाबाद-संभाजीनगर, जालना असो मराठवाड्यातील कुठल्याही शहर असो… इथेही काम मुख्यमंत्र्यांना सुरू करावं लागेल. कारण, जनतेच्या आक्रोशाची दखल जे घेत नाही त्या राज्यकर्त्यांना जनता जागेवर ठेवत नाही त्यांना खाली खेचल्याशिवाय जनता थांबत नाही. हा आक्रोश त्यांना जागे करण्यासाठी आहे. हे सिंहासन तुम्हाला मिरवण्यासाठी नाहीये. जनतेच्या समस्या सोडवणार नसाल तर त्या सिंहासनावर बसवण्याचा तुम्हाला अधिकार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात