मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपुरात हाय प्रोफाईलवर पार्टीवर छापा, अमली पदार्थांच्या सेवनाची मिळाली होती माहिती

नागपुरात हाय प्रोफाईलवर पार्टीवर छापा, अमली पदार्थांच्या सेवनाची मिळाली होती माहिती

सांयकाळपासून सुरू झालेल्या या पार्टीला दीड ते दोन हजार लोकांनी हजेरी लावली होती.

सांयकाळपासून सुरू झालेल्या या पार्टीला दीड ते दोन हजार लोकांनी हजेरी लावली होती.

सांयकाळपासून सुरू झालेल्या या पार्टीला दीड ते दोन हजार लोकांनी हजेरी लावली होती.

नागपूर : नागपूरच्या हिंगणा (Hingna) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका फार्महाऊसवर अमली पदार्थांच्या सेवनासह पार्टी (Drug party in farm house nagpur) सुरू होती. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी पथकासह याठिकाणी छापा टाकला. मात्र, पोलीस येणार असल्याची माहिती आधीच आयोजकांनी पार्टीतून ड्रग्ज आणि आक्षेपार्ह वस्तू बाहेर काढल्या होत्या, अशी माहिती मिळाली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं -

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर या ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना हिंगणा येथील डोंगरगाव येथे असलेल्या गिरनार फार्म हाऊसवर (Girnar farm house nagpur) घडली. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत नफीस, शिवा व एक तरुणी हे प्रमुख होते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एका ग्रुपने ही पार्टी आयोजित केली होती.

त्यांनी याठिकाणी सिंगल एंट्रीसाठी 1100 आणि ग्रुप एंट्रीसाठी 30 ते 50 हजार रुपये दर ठेवले होते. या पार्टीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना आधीच विश्वासात घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याठिकाणी तरुण आणि तरुणींबरोबरच संशयित आणि व्यावसायिक गुन्हेगारही मोठ्या संख्येने आल्याची माहिती आहे.

सांयकाळपासून सुरू झालेल्या या पार्टीला दीड ते दोन हजार लोकांनी हजेरी लावली होती. पार्टी आयोजित करण्यासाठी आणि मद्यासाठी पोलिसांची परवानगीही घेण्यात आली होती. पार्टीत दारूसोबत अमली पदार्थांचे सेवनदेखील सुरू होते. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना रात्री साडेअकराच्या सुमारास नाईट राऊंड करताना पार्टी आणि सुमित ठाकूरच्या उपस्थितीची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी छापा टाकला.

तर तिकडे पोलीस छापा टाकणार असल्याची माहिती आयोजकांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस येण्याआधीच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आयोजकांचे साथीदार मागच्या दाराने फरार गेले. पोलीस पथक पार्टीत दाखल होताच याठिकाणी गोंधळ उडाला. याचवेळी हिंगणा पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याठिकाणी तपास केला असता पार्टीत आणि कारमध्ये दारू सापडली. तर याबाबत दारू पिण्यासाठी परवानगी घेतल्याचे आयोजकांनी पोलिसांना सांगितले.

हेही वाचा - Nagpur Crime : वृद्धांनी ATM वापरताना काळजी घ्या; नागपूरात हातचलाखीने 81 वर्षीय आजोबांचे 40 हजार लांबवले

तर हिंगणा पोलिसांनी परवानगी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर कारवाई केली आहे. कलम 188 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर ठाकूरला पोलीस ठाण्यातून सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार हिंगणा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेची गंभीर दखल घेतली. त्यांनी या घटनेनंतर हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.एस. परदेशी यांची तत्काळ बदली केली आहे.

First published:

Tags: Crime news, Drugs, Nagpur News, Party night