अमरावती, 22 जुलै : अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहितेसोबत गोड बोलून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. यानंतर आरोपीने तिला धक्कादायक उत्तर दिल्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे तक्रार दिली आहे. आरोपीने 8 महिन्यांपासून आपले शारीरिक शोषण केले असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मला तू खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, अशा भूलथापा देऊन एका विवाहितेचे लैंगिक शोषण करण्यात आले होतो. तसेच यानंतर पुढे आरोपी तरुण तिला टाळू लागला होता. तसेच त्याला याबाबत जाब विचारला तर त्याने धक्कादायक उत्तर दिले. तो म्हणाला की, डिलिव्हरी होऊन बायको घरी परतली आहे. आता तुला कशाला ठेवू, असे उत्तर त्याने संबंधित विवाहितेला दिले. यामुळे या महिलने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी 20 जुलैला तक्रार दिली. यानंतर आरोपी रवी तुळशीराम भाकरे (रा. अमरावती) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही 2019 पासून अग्रवाल यांच्या घरी कामाला होती. त्या दरम्यान, तिथेच काम करणारा आरोपी रवीसोबत तिची ओळख झाली. आरोपीने तिला मला तू खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हणून प्रेमाची मागणी घातली. तसेच महिलेलासुद्धा आरोपी आवडत असल्याने तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. मोबाइलवर बोलणे वाढू लागले. तसेच जुलै 2019 मध्ये आरोपीने तिला त्याच्या बहिणीच्या घरी राजुरा येथे नेले. तेथे तिला आमिष देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हेही वाचा - अधिकारी व्हायचं होतं पण तुरुंगात पोहोचले; 4 महिला आमदारांच्या फसवणूक प्रकरणी MPSC करणाऱ्या ‘बंटी-बबली’ला अटक दरम्यान, 10 महिन्याआधी पीडितेचे पती मरण पावला आहे. तेव्हापासून ती माहेरी राहत होती. अशातच 1 ऑक्टोबर 2021 रोजी आरोपी तिच्या माहेरी पोहोचला. तसेच भांडण व शिवीगाळ करून तिला सोबत घेऊन गेला. इतकेच नव्हे तर रस्त्याने त्याने तिला बेदम मारहाणही केली. तेव्हापासून आरोपीने पीडिताला व तिच्या मुलीला सोबत ठेवले. पीडिताच्या मुलीच्या नावे असलेली एलआयसी पॉलिसी तोडून तिचे 60 हजार रुपये खर्च केले. पीडित व तिच्या मुलीला स्वत:जवळ ठेवणाऱ्या आरोपी रवी भाकरे याने अचानक 1 जुलैपासून घरी जाणेच बंद केले. त्यामुळे पीडिताने त्याला फोन केला असता मी तुझ्यासोबत राहत नाही. आता माझी बायको डिलिव्हरी होऊन घरी आली आहे. ती असल्यावर तुझ्यासोबत कशाला राहू, तू तुझे पाहून घे, मी तुझे पैसे देत नाही, तुला जे करायचे ते कर, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली, असे पीडितेने म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक सोनाली मेश्राम पुढील तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.