मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अधिकारी व्हायचं होतं पण तुरुंगात पोहोचले; 4 महिला आमदारांच्या फसवणूक प्रकरणी MPSC करणाऱ्या 'बंटी-बबली'ला अटक

अधिकारी व्हायचं होतं पण तुरुंगात पोहोचले; 4 महिला आमदारांच्या फसवणूक प्रकरणी MPSC करणाऱ्या 'बंटी-बबली'ला अटक

पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ, आमदार श्वेता महाले, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

पुणे 22 जुलै : राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक झाल्याची घटना पुण्यात उघडकीस आली होती. प्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी आता ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ, आमदार श्वेता महाले, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. भामट्याकडून 4 महिला आमदारांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? याप्रकरणी आधी महिला आमदारांनी सायबरला तक्रार दिली होती, मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला. त्यानंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांना फोन करून मुकेश राठोड असं नाव सांगत त्याची आई बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचं सांगितलं. तसंच तिच्या औषध उपचाराकरिता पैशाची गरज आहे, असे सांगून ३ हजार ४०० रुपये गुगल पे नंबर देऊन त्यावर पाठवण्यास सांगितले होते. माधुरी मिसाळ या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी आमदार देवयानी फरांदे, मेघनाताई साकोरे, मेघना बोर्डीकर, श्वेताताई महाले यांनी त्यांनासुद्धा आरोपी मुकेश राठोड याने फोन करून अशाच प्रकारचे कारण सांगून पैशाची मागणी केली असल्याचे समोर आले. यावेळी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी मुकेश राठोड हा बुलडाणा जिल्ह्यातील आहे. त्याचे शिक्षण बी. ए. झाले आहे. तर त्याने ज्या गुगल पे नंबरचा वापर केला नंबर धारकाचं नाव सुनीता कल्याण क्षीरसागर असं आहे. सुनीता ही बीएससी झाली असून, ती औरंगाबादची राहणारी आहे. 'पुरंदर'च्या वेढ्यात अडकल्या पवार कन्या! सुप्रिया सुळेंना 2024 ची परीक्षा कठीण जाणार? हे दोघेही या गुन्ह्यातील आरोपी आहेत. हे दोघेही एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. या दोघांनाही खर्चासाठी पैसे हवे होते. म्हणून त्यांनी मिळून या चार आमदारांना खोटं सांगून पैसे घेतले. वैद्यकीय कारण सांगितल्यावर पैसे मिळतात म्हणून त्यांनी हे कारण सांगितले होते. वैद्यकीय कारणासाठी आमदार मदत करतात ही माहिती दोघांना होती. या दोघांनाही औरंगाबादहून ताब्यात घेतले आहे. हे दोघे शेतकरी कुटुंबातील असून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यांनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास बिबवेवाडी पोलीस करत असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
First published:

Tags: Crime news, Financial fraud

पुढील बातम्या