जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वाशिममध्ये संतापजनक प्रकार, 60 वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार

वाशिममध्ये संतापजनक प्रकार, 60 वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार

वाशिममध्ये संतापजनक प्रकार, 60 वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार

आरोपीचे वय 60 वर्ष आहे.

  • -MIN READ Washim,Maharashtra
  • Last Updated :

वाशिम, 25 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील विविध भागातून विनयभंग, अत्याचार, बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहेत. यातच आता वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 60 वर्षाच्या वृद्धाने एका 15 वर्षांच्या गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वय 60 वर्ष आहे. मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम लावना येथे या 60 वर्षाच्या वृद्धाने 25 वर्षाच्या गतिमंद मुलीवर अत्याचार केला. ही संतापजनक घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीनंतर आज 25 सप्टेंबरला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. हेही वाचा -  Beed : हिटर वापरताय? एक चूक जीवावर बेतली, बीडमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू रमजान परसुवाले, असे आरोपीचे नाव आहे. लावणा येथील एका 50 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादी महिलेच्या 25 वर्षीय गतिमंद मुलीवर गावातीलच एका 60 वर्षीय वृद्धाने अत्याचार केला. आरोपी रमजान परसुवाले (वय६०) याने काल 24 सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घरात कोणी नसताना या तरुणीवर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पीडित मुलीच्या आईने यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी भादंवि कलम 376 तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे आणि पथकाने अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एसडीपीओ पांडे हे करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात