जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डॉक्टरने अल्पवयीन पारिचारिकेसोबत केलं संतापजनक कृत्य; नाशिकमधील घटनेने खळबळ

डॉक्टरने अल्पवयीन पारिचारिकेसोबत केलं संतापजनक कृत्य; नाशिकमधील घटनेने खळबळ

डॉक्टरने अल्पवयीन पारिचारिकेसोबत केलं संतापजनक कृत्य; नाशिकमधील घटनेने खळबळ

पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 12 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील विविध भागातून यासंबंधित घटना उघडकीस येत आहे. आता नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका डॉक्टरने अल्पवयीन परिचारिकेवर शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - डॉ. उल्हास कुटे असे आरोपी नराधमाचे नाव आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे एका खासगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या रूममध्ये प्रवेश केला. तसेच माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगत रूममध्ये प्रवेश केला. यानंतर पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने केली आहे. इतकेच नव्हे तर अत्याचार केल्यानंतर संशयित आरोपी कुटे याने पीडित तरुणीला धमकी दिली. ही बाब जर कुणाला सांगितली तर तुला कामावरून काढून टाकील, अशी धमकी दिली. घडलेल्या या प्रकारानंतर तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलिसात धाव घेतली. यानंतर अंबड पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची दखल घेत पीडितेचे तक्रारीनुसार बलात्कार, पीडित अल्पवयीन आणि अनुसूचित प्रवर्गातील असल्याने पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा -  साखर झोपेत काळाचा घाला; नाशकात मुसळधार पावसाने घेतला घरात झोपलेल्या पती-पत्नीचा जीव याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी नराधम डॉ. उल्हास कुटे याला अटक केली आहे. अंबड पोलिसांनी ही कारवाई केली. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहेल शेख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ या याप्रकरणाचा तपास करत आहेत. बलात्कार, पोस्को आणि ॲट्रोसिटीचाही गुन्हा दाखल झाल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात