जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : पारंपरिक कुंभार उद्योग होणार हायटेक, इलेक्ट्रिक चाकावर द्या भांड्यांना आकार

Video : पारंपरिक कुंभार उद्योग होणार हायटेक, इलेक्ट्रिक चाकावर द्या भांड्यांना आकार

Video : पारंपरिक कुंभार उद्योग होणार हायटेक, इलेक्ट्रिक चाकावर द्या भांड्यांना आकार

फिरत्या चाकावर मातीचे भांडे कसे तयार केले जातात याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येत आहे.

  • -MIN READ Local18 Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 11 जानेवारी : पारंपारिक कला जपली जावी आणि आरोग्यास गुणकारक असलेले मातीचे भांडे व वस्तू वापरले जावे यासाठी एक अनोखा उपक्रम नागपूर   खादी ग्राम उद्योग तर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या फिरत्या चाकावर मातीचे भांडे कसे तयार केले जातात याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येत आहे. आपल्या पारंपारिक कलेविषयी लोकांमध्ये आत्मीयता निर्माण व्हावी आणि माती काम करणाऱ्या कलाकारांना यामधून रोजगार निर्माण व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. काळाच्या ओघात आणि प्रगतीच्या वेगात पुढे जात असताना आपल्या दैनंदिन जीवनात अनेक स्थित्यंतरे आली. आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाचे युगात पुढे जात असताना आपला पारंपारिक अमूल्य ठेवा काही अंशी मागे पडत राहिला. याच पारंपारिक, आरोग्यवर्धक ठेव्यातील एक बाब म्हणजे मातीचे भांडे हे होय. पूर्वी याच भांड्यांच्या वापरातून अन्न शिजवले जायचे मात्र आज अनेक पर्यायी धातू, प्लास्टिक आणि चिनी मातीचे माध्यम उपलब्ध झाल्याने ही पारंपरिक कला कुठेतरी मागे पडत आहे. याचा परिणाम माती काम करणाऱ्या अनेकांच्या रोजगारावर देखील होत आहे. पूर्वापार चालत आलेल्या पारंपारिक पद्धतीने फिरत्या चाकावर मातीची भांडी तयार करण्यात येत होते. मात्र हे मोठ्या मेहनतीचे आणि वेळ खाऊ काम होते. सतत चाकाला हाताने फिरवावे लागत होते. अलीकडच्या काळात पारंपरिक पद्धतीला विज्ञानाची जोड देत खादी ग्रामोद्योगच्या वतीने इलेक्ट्रिक वर चालणारे फिरते चाक असे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक पोट्री व्हील मशीनमुळे वेळ आणि अधिक मेहनतीची बचत झाली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    माती भिजवण्यापासूनचे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योगच्या वतीने हे मोफत प्रशिक्षण देण्यात येत असून दहा दिवस चालणाऱ्या या  प्रशिक्षणामध्ये माती भिजवण्यापासून ते माती ची भांडी तयार करण्यापर्यंत सर्व बारकावे शिकवले जातात. तसेच हे यंत्र बचत गटांच्या माध्यमातून मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. अलीकडच्या काळात कुंभार व माती काम करणाऱ्या कारागिरांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कारागिरांना प्रोत्साहन देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी खादी ग्राम उद्योग तर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.   वाहतुकीचे नियम पाळा आणि शॉपिंगमध्ये सूट मिळवा! नागपुरात सुरू होतोय भन्नाट उपक्रम आरोग्यदायी भांडी पारंपरिक पद्धतीला विज्ञानाची जोड दिल्याने मातीकाम करणाऱ्या कारागिराला दोन पैसे कमवण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. लोकांनी देखील मातीची भांडी वापरावी यासाठी मातीच्या भांड्यांना अग्रस्थानी प्राधान्य देण्यात आले पाहिजे. मातीचे भांडे हे आरोग्यास उपायकारक असून त्यातून अन्न शिजवल्यास त्याची चव आणि आरोग्यास कुठलीही हानी होत नाही.   प्रशिक्षणासह भांडेही मोफत अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये मातीची भांडी वापरण्यासाठी प्रवृत्त करतो. नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोफत या फिरत्या चाकावर भांडी कशी तयार करावी असे प्रशिक्षण देत असतो. मुलांना देखील याबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यांनी बनवलेले मातीचे भांडे त्यांना मोफत वितरण देखील करतो. भविष्यात मातीच्या भांड्यांना एक उत्तम पर्याय म्हणून बघितले जाईल, असे खादी ग्राम उद्योग येथील मातीचे भांडे तयार करणारे प्रशिक्षक लक्ष्मण बोरसरे यांनी सांगितले.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nagpur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात