मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वाहतुकीचे नियम पाळा आणि शॉपिंगमध्ये सूट मिळवा! नागपुरात सुरू होतोय भन्नाट उपक्रम

वाहतुकीचे नियम पाळा आणि शॉपिंगमध्ये सूट मिळवा! नागपुरात सुरू होतोय भन्नाट उपक्रम

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही देखील एक देश सेवाच समजली जाते. नियम कटाक्षाने पाळले तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे.

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही देखील एक देश सेवाच समजली जाते. नियम कटाक्षाने पाळले तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे.

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही देखील एक देश सेवाच समजली जाते. नियम कटाक्षाने पाळले तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Nagpur, India

  नागपूर, 10 जानेवारी : नागपूर  शहरात वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, अनेक सजग नागरिक घाईच्या वेळी देखील वाहतुकीचे नियम पाळण्याबद्दल दक्ष असतात. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही देखील एक देश सेवाच समजली जाते. एका अर्थाने देश सेवेत योगदान देणाऱ्या अशाच लोकांना डोळ्यासमोर ठेवून नागपुरात एक भन्नाट संकल्पना अस्तित्वात येणार आहे. नियम कटाक्षाने पाळले तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. 

  नागपूर महानगर पालिका, व्हीएनआयटी यांच्या सहकार्याने नागपुरातील सोशल इम्पॅक्ट संस्थेने वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना 'ट्रॅफिक रिवॉर्डस्' या मोबाइल अॅप'च्या माध्यमातून 'रिवॉर्डस्' देत आहेत. याचा उपयोग विविध प्रकारच्या खरेदीसाठी देखील करता येणार आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा 'ट्रफिक रिवॉर्डस्'चे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या सोशल इम्पॅक्ट संस्थेने केला आहे.

  पुढील महिन्यात लक्ष्मीनगर चौक ते जापानी गार्डन या मार्गावर हा अभिनव प्रयोग सुरू करण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेसोबत या संदर्भातील करार करण्यात आला आहे. अगोदर दहा चौकांमध्ये हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून  त्यानंतर शहरात विविध ठिकाणी नियमितपणे याचा उपयोग होईल. शहरातील नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन होण्याची सवय दृढ व्हावी आणि वाहतूक कोंडी, रस्ते अपघात मुक्त व्हावे हा यामागील हेतू आहे.

  अपघातांमध्ये कमी येईल

  मागील दोन वर्षांपासून या तंत्रज्ञानावर कार्य सुरू होते. तंत्रज्ञान विकासासाठी 'व्हीएनआयटी'ची मौलिक मदत झाली. तसेच शासनाचे मोठे सहकार्य मिळाले. या संकल्पनेतून लोक स्वतःहून वाहतुकीचे नियम पाळतील व अपघातांमध्ये कमी येईल, असा विश्वास 'ट्रफिक रिवॉर्डस्' तर्फे व्यक्त करण्यात येत आहे. 

  माजी पंतप्रधान ते सचिन तेंडुलकर अनेकांचं श्रद्धास्थान असलेलं गणेश मंदिर, Video

  असे मिळणार बक्षीस

  ट्रॅफिक रिवॉर्डस या तंत्रज्ञानात प्रत्येक चौकावर 8 सेन्सर बसविण्यात येतील. चारही बाजूच्या रस्त्यांवर प्रत्येकी दोन अशी ही व्यवस्था असेल. वाहनांना ट्रॅक करण्यासाठी ट्रॅफिक रिवॉर्डसद्वारा बारकोड दिला जाईल. चौकातील 20 मीटरच्या परिघात सेन्सर्स कार्य करतील. दर सेकंदाला 200 वाहन स्कॅन करण्याची क्षमता सेन्सरमध्ये ठेवण्यात आली आहे. सर्व वाहतूक नियमांचे पालन केल्यास सेन्सर वाहनाला ट्रॅक करून वाहन मालकाच्या खात्यात क्रेडिट पॉईंट्स जमा करेल. या पॉईंट्सला रिडीम करून खरेदीसारख्या अनेक गोष्टींचा आनंद घेता येईल, अशी सोय या तंत्रज्ञानात करण्यात आली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Local18, Nagpur