नागपूर, 23 जानेवारी : गॅस सिलेंडरच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती बघता महागाईचा डोलारा सांभाळणे सर्वसामान्यांसाठी मोठ्या कसरतीचा विषय बनला आहे. नागपुरातील ग्रामीण भागात आजही महिला चुलीवर स्वयंपाक करतात. मात्र त्यातून निघणारा धूर हा आरोग्यास हानिकारक असून अनेक आजारांचे कारण ठरू शकतो. यावर उपाय म्हणून नीरी या संस्थेने तयार केलेली निर्धूर चूल फायद्याची ठरत आहे.
पर्यावरणाच्या क्षेत्रात सखोल अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरीने निर्धूर चूल विकसित केली आहे. ज्यामुळे धुराचे प्रमाण अतिशय कमी होत असून झटपट अन्न शिस्त आणि धुरामुळे होणारे संभाव्य आजार देखील टाळता येऊ शकतात. ग्रामीण भागातील गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त ठरत असून धुरांपासून होणाऱ्या आजारांपासून काही अंशी दूर ठेवण्यास मोठी मदत होत आहे.
सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात. यामुळे नागपूरमध्ये दिवसेंदिवस प्रदुषण वाढत आहे. तसेच चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तसेच चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो.
आजवरची सर्वोत्तम चूल
निर्धूर चुलीवर गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत. त्यासाठी अनेक प्रयोग आम्ही केले. आम्ही आजवरची सर्वोत्तम चूल तयार केली आहे ज्यात आपण कोळसा, लाकूड, बायोमास हे इंधन म्हणून जाळू शकतो. यामध्ये वायू प्रदूषण कमी होतं व आरोग्यास होणारे आजार देखील टाळता येतात.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये 800हून जास्त प्रयोगशाळा आहेत.
Nagpur : जुन्या काळातील जमीन मोजण्याच यंत्र कसं होत? पाहा Video
धूर कमी
भारतातील ही एकमेव संस्था आहे जी यावर काम करते. आपण अनेक टेस्टिंग करून सर्वोत्तम चूल तयार केली आहे. सी एस आय आर नीरीने ही चूल पेटंट केली आहे. यामध्ये धूर कमी आणि थर्मल कॅपिसिटी जास्त आहे. त्यामुळे ही सर्वोत्तम चूल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.