नागपूर, 28 मे : कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cordelia Cruise drug party case) एनसीबीने आर्यन खान (Aryan Khan) याला क्लीन चिट दिली आहे. आर्यन खान याला क्लीन चिट मिळाल्यानंतर आता या प्रकरणात तपास करणारे एनसीबी मुंबईचे (NCB Mumbai) तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारले असता त्यांनी वानखेडेंवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग सातत्याने होत आहे. हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. आर्यन खान प्रकरणात काँग्रेसने आपली भूमिकाही त्यावेळी स्पष्ट केली होती. समीर वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण, वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेतील एक पोपट होता आणि या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही हे आपल्याला पुढील काळात दिसून येईल.
समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं...
आर्यन खानला क्लिन चिट देण्यात आल्याने आता त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकत कारवाई केलेल्या मुंबई एनसीबीचे (NCB) तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर सीएनएनने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर समीर वानखेडे यांनी म्हटलं, "मी या प्रकरणाशी आता संबंधित नाहीये आणि यावर भाष्य करू इच्छित नाही".
वाचा : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यनकडे ड्रग्ज होते की नाही? NCBने केला मोठा खुलासा
काँग्रेसचं सोशल मीडिया सेशन
भाजप दररोज 40 कोटी रुपये खर्च करुन देशभरात 38 लोकं वापरुन जे काम करत आहे ते काम काँग्रेस करणार नाहीय वस्तूस्थिती समाजासमोर मांडणं ही भूमिक काँग्रेसची सातत्याने राहिली आहे. काँग्रेसचे जे कार्यकर्ते सोशल मीडियात काम करत आहेत त्यांना आणखी ट्रेनिंग देणं, अलिकडच्या स्पर्धेत कसं टिकता येईल यावर देशव्यापी काँग्रेस कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे.
राणा दाम्पत्याला टोला
राणा दाम्पत्याकडून आज नागपुरात हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. यावर नाना पटोले यांनी म्हटलं, हनुमान चालिसा आस्थेचा विषय आहे, याचं राजकारण कशासाठी ? महागाईसारखे मुद्दे सोडून धार्मिक मुद्द्यावरुन राजकारण सुरू आहे. जनतेचे प्रश्न सोडून धर्माचं राजकारण सुरू असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Nagpur, Nana Patole, NCB