उदय तिमांडे, नागपूर, 16 मार्च : सोशल मीडियावर दिवसाला अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकांच्या करामती यामध्ये कैद होताना दिसतात. लोक कधी काय करतील याचा काही नेम नाही. असे अतरंगी आणि विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या नागपूरमधून समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल. नागपूरमध्ये सध्या G20 च्या निमित्ताने सुशोभीकरण सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि दुभाजकावर झाडं लावली जात आहेत. मात्र, या दुभाजकावर लावलेली झाडंचं चक्क चोरली जात असल्याचा प्रकार घडलाय. या प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आला असून याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
नागपुरात सध्या G20 च्या निमित्ताने सुशोभीकरण सुरू आहे, अशात दुभाजकावरील झाडं चोरून नेण्याचा प्रकार समोर pic.twitter.com/cwq4UmYAUb
— News18Lokmat (@News18lokmat) March 16, 2023
नागपूरच्या वर्धा वर्गावरील, छत्रपती चौकाजवळ हा झाडं चोरीचा प्रकार घडलाय. एका BMW कारमध्ये दोन तरुण रात्रीच्या वेळी या चौकाजवळ आले आणि दुभाजकावरील झाडं चोरून कारमध्ये टाकली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तरुण दुभाजकावरची झाडे कशी चोरी करत आहेत. हा सर्व प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकाराविषयी अनेकजण संतापदेखील व्यक्त करत आहे.
दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकार समोर आला होता. दिल्लीमधून सेम प्रकार समोर आला होता. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता.