विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 15 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी ही बसेवा मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आली होती. ही बसेसा सर्व साई भक्तांसाठी सोयीची ठरेल. त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक विकासामध्ये गेम चेंजर ठरेल अशी अपेक्षा होती. पण अवघ्या तीन महिन्यात ही एसटी बंद करण्याची नामुष्की हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर ओढावली आहे.
का आली वेळ?
समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या एसटीचा खर्चही प्रवाशांअभावी निघत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच काय तर डिझेलचे पैसेही निघत नसल्याने एसटीने समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या नागपूर- शिर्डी बस सेवेला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
समृध्दी महामार्गावरून अवघ्या 8 तासात नागपूर ते शिर्डी असा प्रवास करत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठ्या अपेक्षेने बेस सेवा सुरू केली होती. नागपूरच्या गणेशपेठ आगारातून विना वातानुकुलीत सेमी सिटर कम स्लीपर स्वरुपाची बस सुरू करण्यात आली होती. या बसचं 1300 रुपये तिकीट होतं.
सोलापूरच्या विकासासाठी 72 वर्षांचा वृद्ध मैदानात, पाहा कोणत्या प्रश्नासाठी आली वेळ, Video
उद्धाटनानंतर डिसेंबर महिन्यात 41 टक्के प्रवासी मिळाले होते.तर डिसेंबर महिन्यात एकूण आसन क्षमतेच्या तुलनेत 40.98 टक्के प्रवासी मिळाले होते. मात्र, जानेवारी महिन्यात त्यात कमालीची घट होऊन आसन क्षमतेच्या तुलनेत फक्त 13.51 टक्के प्रवासी मिळाले. फेब्रुवारी महिन्यात हा दर 8.58 टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात तर अनेक दिवस एकाही प्रवाशाने या बसने प्रवास केला नाही. त्यामुळेच आता ही बस सेवा बंद ठेवण्याची वेळ एसटीच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.
या सेवेच्या माध्यमातून आठ तासात शिर्डीला पोहोचता येत असल्याने वेळेची आणि पैशांची बचत होईल असा अंदाज वर्तविला गेला होता,शिवाय ज्येष्ठ नागरिकांकरता सवलतही होती. त्यानंतरही साई भक्तांनी या बसकडं पाठ फिरवली आहे. सध्या परीक्षांचे दिवस आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या आणखी कमी होईल, असा अंदाज आहे. एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाकडे ही बस सेवा बंद करण्याची परवानगी मागत सध्या बस सेवा स्थगित ठेवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.