Home /News /maharashtra /

नागपुरची लेक राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, जाणून घ्या, कोण आहे ही?

नागपुरची लेक राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, जाणून घ्या, कोण आहे ही?

ट्रायथलॉन ही एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे ज्यामध्ये खेळाडूंना पोहणे, नंतर सायकल चालवणे आणि नंतर शक्य तितक्या वेगाने मागे-पुढे धावणे आवश्यक आहे.

     नागपूर, 28 मे : ट्रायथलिट संजना जोशी (Triathlete Sanjana Joshi) ही लंडनमधील बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. ही 22 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (22nd Commonwealth Games) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनने (Indian Triathlon Federation) 17 वर्षीय संजना जोशी हिची अलीकडील प्रभावी कामगिरीच्या आधारे  भारताचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. नागपुरातील पहिलीच महिला खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झालेली संजना ही नागपुरातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिची स्प्रिंट अंतर ट्रायथलॉनसाठी निवड झाली. ट्रायथलॉन ही एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे ज्यामध्ये खेळाडूंना पोहणे, नंतर सायकल चालवणे आणि नंतर शक्य तितक्या वेगाने मागे-पुढे धावणे आवश्यक आहे. स्प्रिंट अंतर ट्रायथलॉनमधील शर्यतीचे अंतर 750 मीटर पोहणे, 20 किमी सायकलिंग आणि 5 किमी धावणे असे असते. हेही वाचा - IPL 2022 : Virat Kohli साठी काळ ठरतोय हा बॉलर, जुन्या जखमेवर पुन्हा केला वार! 'या'ठिकाणी घेतेय प्रशिक्षण -  संजना ही डॉ. अमित समर्थ यांच्या अंतर्गत माइल्स एन मिलर्स एन्ड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि विशेषतः संजना ही सोमलवार निकलस स्कूल, नागपूरची विद्यार्थिनी आहे. भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनने गेल्या महिन्यात चेन्नई येथे आयोजित केलेल्या निवड आणि मूल्यमापन शिबिरात तिने सहभाग घेतला होता.
    First published:

    Tags: Games, India, Nagpur, Sports

    पुढील बातम्या